हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.३१,हिंगोली जिल्हयातील सेनगांव येथील सहकाररत्न ओमप्रकाश देवडा माध्यमिक विद्यालयामधुन नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी परीक्षेत सुमित बालासाहेब गायकवाड याने प्रथम क्रमांक पटकावत ९४.४० टक्के गुण मिळविल्याने त्याचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळाकडुन मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत सेनगांव शहराती सहकाररत्न ओमप्रकाश देवडा माध्यमिक विद्यालयातुन तोष्णीवाल कला,वाणिज्य महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा.बि.जे.गायकवाड यांंचा मुलगा सुमित बालासाहेब गायकवाड याने ९४.४० टक्के गुण घेत प्रथम येण्याचा मान पटकविला आहे. सुमित गायकवाड याच्या यशाबद्दल शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षेत्तर कर्मचारी वर्ग तसेच संस्थेच्या सर्व पदाधिका-यांनी अभिनंदन केले.

