shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दोन दिवसांच्या पावसाने जमा झाला दीड महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा..!!



पिंपरी-  चिंचवड :-  मागील दोन दिवसांत धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. तब्बल 2 टीएमसी पाणीसाठा वाढला. पुणेकरांना दीड महिना पुरेल एवढा पाणीसाठा आहे. खडकवासला धरणात 50.63 मिलिमीटर, पानशेत 47.79, वरसगाव 39.40, टेमघर 25.06 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत आता 12.07 टीएमसी म्हणजेच 41.40 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच कालावधीत 99.23 टक्के म्हणजेच 28.96 टीएमसी पाणीसाठा होता. या चारही धरणांची एकूण क्षमता 29.15 टीएमसी आहे. ही धरणे 100 टक्के भरण्यासाठी आणखी दमदार पावसाची गरज आहे.

सोमवारी रात्री आणि मंगळवारी दिवसभर हजेरी लावणाऱ्या पावसाने बुधवारी सकाळपासूनच दडी मारली आहे. 12 ते 15 ऑगस्टपासून मध्यम तर ऑगस्टच्या शेवटी जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

गणेशोत्सव ऐन तोंडावर आला आहे. त्यामुळे पुणे शहरातील पाणीकपातीचा निर्णय महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुढे ढकलला आहे. त्यामुळे सध्या तरी हे संकट टाळले आहे. मात्र, जोरदार पाऊस न झाल्यास पाणीकपात अटळ असणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
close