shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत पी. पी .इ किट व सॅनिटायझर चे वाटप ..!!

लोहा । प्रतिनिधी :
लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांच्या सुविद्य पत्नी तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ .आशाताई शामसुंदर शिंदे यांचा वाढदिवस 20 जुलै रोजी पासून सामाजिक उपक्रम राबवून लोहा ,कंधार मतदार संघासह नांदेड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा होत असताना काल शुक्रवारी लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टरांना पी. पी .ई  किटचे व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.



यावेळी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ .विपीन इटनकर ,लोहा ,कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष ,आमदार शामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालय व कोविड सेंटरच्या सर्व डॉक्टरांना पीपी ई-कीट चे व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. यावेळी  तहसीलदार विठ्ठल परळीकर ,पोलीस निरीक्षक भागवत जायभाये, उपजिल्हा रुग्णालयातील अधीक्षक डॉ. प्रशांत जाधव ,जि .प सदस्य चंद्रसेन पाटील ,श्याम आण्णा पवार, युवा नेते रोहित पाटील शिंदे ,नायब तहसीलदार राम बोरगावकर, अशोक मोकले, जीवन चव्हाण ,बालाजी खिल्लारे, सिद्धेश्वर पाटील वडजे, बाबुराव डोम,  प्रसाद जाधव ,प्रणव वाले ,सचिन कल्याणकर यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
close