shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महिलेच्या पोटातून काढला 5 किलोचा गोळा साईसिद्धि हॉस्पिटलने दिले आदिवासी महिलेस जीवदान..!!

नाशिक विभाग प्रतिनिधी ता:14➤
धामोडे येथील आदिवासी कुटुंबातील ताराबाई मोरे (45) हि महिला बऱ्याच दिवसापासून पोटदुखीच्या आजाराने त्रस्त होती. अनेक ठिकाणी उपचार करून सुद्धा काहीच फरक पडत नव्हता. आजार बळावत गेल्यामुळे अंगातील रक्ताची मात्रा ही अतिशय खालावली गेली होती.अशातच त्यांना एका रुग्णाने येवला येथील साईसिद्धि हॉस्पिटल पारेगाव रोड येथील डॉ. श्रीकांत काकड कडे जाण्याचा सल्ला दिला, व त्यांना सांगितले कि डॉ. काकड हे सामाजिक कार्यात खुप चांगले आणि सेवाभावी आहेत.



काकड डॉक्टरांकडे आल्यानंतर डॉक्टरांनी पोटात मोठा गोळा असल्याचा नातेवाईकांना सांगितले. तसेच त्याचे शस्ञक्रिया करणे गरजेचे आहे हे हि समजून सांगितले. परंतु रुग्णाची परिस्थिती अत्यंत हलाखीची व गरीबीची असल्या कारणाने त्याने ऑपेरेशन करण्यास असमर्थता दर्शविली. परंतु त्या रुग्णाला काकड डॉक्टरांनी महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेची माहिती सांगितली आणि त्या रुग्णाचे पूर्णतः मोफत ऑपरेशन होईल अशी माहीती  दिली. त्या नंतर साई सिद्धी हॉस्पिटलमध्ये, डॉ. श्रीकांत काकड ,डॉ महेश जाधव, डॉ राहुल काकड, डॉ विनोद गायकवाड, डॉ पवन बडोदे, डॉ कुलदीप सानप यांनी ही अत्यंत जोखमीची अशी शस्रक्रिया पार पाडली. यात महिलेच्या पोटात तब्बल  5 किलो 100 ग्रामचा गोळा निघाला. शास्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानले. ही शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी सौ प्रियांका काकड,सौ अश्विनी काकड,लक्ष्मण सांगळे,प्रवीण खैरनार,दिलीप सूर्यवंशी, पूनम वाघ,प्रवीण निकाले,गीतांजली बोरसे यांचे मोलाचे योगदान लाभले.

सोबत पोटाटून काढलेला 5 किलो 100 ग्राम चा गोळा व डॉ. श्रीकांत काकड व सोबत सर्व सहकारी डॉक्टर व स्टाफ यांचा फोटो.
close