shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विक्की खोकरे यांना डॉ बाबा आमटे समाज सेवक पुरस्कार जाहीर…!गोरगरीबांचा मदतीला धावून जाणारे आरोग्यदूत..!!

एरंडोल –
 येथील नेहमी गोरगरीबांचा मदतीला धावून जाणारे आरोग्यदूत युवराज उर्फ विक्की खोकरे यांना वरणगाव येथील आई सावित्री माई फुले बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय कर्मयोगी डॉ बाबा आमटे समाज सेवक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.कोरोना महामारीच्या भयंकर परिस्थितीत कोरोना रुग्णांची अवस्था अत्यंत बिकट व दयनीय असून या कोरोना रुग्णना जवळ न जाता अगदी रक्ताचे नाते असलेली व्यक्ति देखील लांब राहते.

मात्र या सर्वाना अपवाद ठरणारे विक्की खोकरे नेहमी त्यांच्या मदतीला धावून जात असे. आज खऱ्या अर्थाने हा सन्मान त्यांना मिळाला.विशेष म्हणजे विक्की खोकरे हे कोरोनाग्रस्त रुग्णाची मदत करत असतांना ते स्वत: कोरोना पॉझिटिव्ह झाले व हिम्मत न हारता त्यांनी कोरोनावर मात करून आपली रुग्णसेवा पुन्हा सुरुच ठेवत कोरोना रुग्णांचं आधारवड बनलाय,अशा खऱ्या कोरोना योद्धाचा सन्मान सोहळा 15 ऑगस्ट रोजी होणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे

विक्की खोकरे यांना पुरस्कार जाहीर झाल्याने आमदार चिमणराव पाटील, नगराध्यक्ष रमेश भैया परदेशी, शालिकभाऊ गायकवाड, रमेश अण्णा महाजन, छोटु आबा चौधरी, राजेंद्र आबा चौधरी, किशोरभाऊ निंबाळकर, अमित दादा पाटील,ॲड विलास मोरे, प्रा आर आर पाटील,आदींनी अभिनंदन केले.खऱ्या कोरोना योद्धाला शिर्डी एक्सप्रेसचा मानाचा मुजरा..!!
close