shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"मांजरा धरणा"तील पाणीसाठा आला मृतसाठ्या बाहेर..!!


बीड - लातूर- उस्मानाबाद जिल्ह्याची तहान भागणार  ....!!! 

प्रकाश मुंडे  | तालुका प्रतिनिधी केज: 
केज व अंबाजोगाई शहरासह बीड-लातुर-उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील पाणी साठ्याने आज २१ आँगस्ट रोजी मृत साठ्याची पातळी ओलांडली असल्यामुळे या तीन ही जिल्ह्यातील अनेक गावात आता मांजरा धरण भरण्याची आशा निर्माण झाली आहे.
   



बीड जिल्ह्यासह संपुर्ण मराठवाड्यात यावर्षी जून महिन्यापासूनच दमदार पावसास सुरुवात झाली असल्यामुळे या तीनही जिल्ह्यात यावर्षी मांजरा पुन्हा लवकरच भरणार असा विश्वास निर्माण झाला होता. जून-जुलै आणि अर्धा आँगस्ट संपला असतांना मांजरा धरणातील पाण्याने अध्याप फक्त मृतसाठ्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे आता मांजरा धरण भरण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.
     

बीड जिल्ह्यातील अनेक भागात जूनच्या सुरुवातीपासून दमदार पावूस सुरु झाला आहे.
पावसाचा जोर सर्व राज्यामध्ये असल्यामुळे राज्यातील अनेक मोठ-मोठे धरण भरले असल्याच्या बातम्या ऐकावयास मिळत असल्या तरी मांजरा धरणाच्या कँचमेंट एरियात अध्यापही समाधानकारक पावूस झाला नसल्यामुळे मांजरा धरणात अध्याप समाधानकारक पाणी साठा जमला नाही. मांजरा धरणातुन आज सकाळी ६ वाजता (२१ आँगस्ट ) जारी करण्यात आलेल्या अधिकृत माहिती नुसार मांजरा धरणात फक्त ४८.१९२ दलघमी पाणी साठा जमला आहे. मांजरा धरणाच्या मृतसाठ्यातील पाणी साठवण क्षमता ४७. १३० दलघमी असून आज २१आँगस्ट रोजी मांजरा धरणातील उपयुक्त पाणी साठा मृतसाठ्याबाहेर आला असून धरणातील आजचा उपयुक्त पाणी साठा फक्त १.०६२ दलघमी. एवढाच म्हणजे ०.६० टक्के आहे. मांजरा धरणातील उपयुक्त पाणी साठा साठवण क्षमता १७६ ९६३ दलघमी एवढी आहे.

मांजरा धरणात २१ आँगस्ट रोजी सकाळी सहा वाजता करण्यात आलेल्या नोंदी प्रमाणे धरणात फक्त ४८.१९२ दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून संपुर्ण धरण भरण्यासाठी २२४.०९३ दलघमी पाणीसाठा आवश्यक असतो. म्हणजे मांजरा धरण भरण्यासाठी अजून १७२.९६३ दलघमी पाणीसाठ्याची आपल्याला प्रतिक्षा करावी लागणार आहे. सध्या नदी क्षेत्रातील पाण्याच्या प्रवाहातुन मांजरा धरणातील पाणी येण्याचा वेग हा १.४७३ दलघमी एवढा असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.                 

केज शहराला तर अनेक वर्षांपासून मांजरा धरणाच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागले आहे. त्यामुळे केज शहरातील नागरिक मांजरा धरणातील पाणीसाठा वाढल्याने आनंदी झाले आहेत.
close