इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)➤
बावडा गावचे सुसंस्कृत नेतृत्व व संपूर्ण महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात जाणकार व्यक्तिमत्व असणारे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
बावडा गावचे सुपुत्र व स्व .मा शहाजीराव पाटील व स्व .रत्नप्रभादेवी पाटील यांचे सुपुत्र आहेत.
आई वडील यांच्या सुसंस्कृत संस्कारात व पाटील परिवारातील सर्वांच्या कृपा छायेत असणारे विवेकशील विचाराने वाढलेले वटवृक्ष म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते .लहान मोठ्यांना मान सन्मान देऊन सर्वांना आपलंसं करणारं नेतृत्व सर्वसामान्य जनतेत मिसळून लोकांचे संघटन करून त्यांच्या मनात आदराचे कर्तुत्वाचे स्थान निर्माण करणारे व स्वकर्तृत्वातून आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे आदर्श रत्न म्हणून ओळखले जातात .त्यांचे राजकीय क्षेत्रात विद्यार्थीदशेपासूनच हिरारीने भाग घेऊन संघटन करत असत त्यांना त्यांचे चुलते स्व .माजी खासदार शंकरराव पाटील यांच्या निस्वार्थ राजकारणात ते तयार झाले इंदापूरच्या राजकारणात जिल्हा परिषद सदस्य ,जिल्हा दूध संघ व नंतर अपक्ष आमदार राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री राज्य संघ केंद्रीय समिती अशा पद्धतीने राजकीय क्षेत्रात आपला कार्यकर्तृत्वाचा ठसा महाराष्ट्राच्या राजकारणात उमटवून इंदापूर तालुक्याचे नावलौकिक करून संपूर्ण देशात सहकार खात्याचे जाणकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते एक आदर्श असे सर्वांना सामावून घेऊन महाराष्ट्राच्या सर्व मान्यवरांना सोबत घेऊन विधानसभेत अनेक कामकाज करणारे संसदीय कार्य मंत्री म्हणून उत्कृष्ट कार्य त्यांनी केले आहे.
त्यांनी इंदापूर तालुक्यात जनतेला बरोबर घेऊन अनेक शैक्षणिक संस्था शेतकरी संस्था साखर कारखाने इत्यादीचे विकास करून जनते ला संस्थेचे मालक करणारे हे नेतृत्व आहे त्यांनी इंदापूर तालुक्याच्या जडण-घडण यात सर्व क्षेत्रात भरीव असे कार्य करून सर्व साक्षीने आपले कार्य करून दाखविले आहे इंदापुर मध्ये भविष्यात प्रशासन व आरोग्यातील अडी-अडचणी पाहून त्यांनी अत्यंत सुंदर असे भरीव काम केले आहे.
त्यांचा हा दूरदृष्टी पणा म्हणजे इंदापूर तालुक्याचा इंदापूर तालुक्यातील सर्वांगीण विकास म्हटले जाते अहोरात्र सतत कार्यात् मग्न असणारे संयमी नेतृत्व एखाद्याने चूक केली तर त्याला समजावून पुन्हा उभारी देऊन कार्याला लावणारे हे समाजातील एक दैवत आहे.सत्ता असो वा नसो त्यांच्या कार्यात कधीच बदल दिसला नाही हे वास्तव महाराष्ट्र व इंदापूरची जनता प्रत्यक्ष पाहत आहे हर्षवर्धनजी पाटील साहेब हे सर्व जनतेला आपलेसे वाटणारे व्यक्तीमत्व आहे त्यांनी कधी अहंकाराचा वारा लागून दिला नाही कधी कोणावर रागावणारे नाहीत त्यांचा शांत साधा स्वभाव हाच त्यांचा अनमोल असं संस्कार रुपी रत्न आहे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून खंबीरपणे साथ देणाऱ्या आदरणीय वहिनीसाहेब व त्यांची मुलगी म्हणजे ज्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून उत्कृष्ट असे नाविन्यपूर्ण कार्य करणारे कुमारी अंकिता ताई पाटील आणि इंदापूर तालुक्यातील सर्व जनतेच्या सुखदुःखात सतत रमणारे जनतेच्या मनामनात ठसा उमटविणारे जनसामान्यांचे नेते विद्यमान नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन दादा पाटील अशी गुणवंत परिवाराची साथ असणारे आदर्श व्यक्तिमत्व माजी मंत्री श्री.हर्षवर्धन जी पाटील साहेब आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्त महाराष्ट्रातील त्यांना सर्वस्तरातून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे...






