shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गणेश मंडळाने गणेशोत्सवासाठी पालिका व स्थानिक प्रशासन यांच्या धोरणानुसार परवानगी घेणे आवश्यक..!!

एरंडोल। प्रतिनिधी(प्रमोद चौधरी)➤
आज दि. 20/08/2020 रोजी सायंकाळी 06:30 वाजता नगर पालिका सभाग्रूह येथे गणेशोस्तव  2020 अनुषंगाने शहरातील सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष/ उपाध्यक्ष आणि प्रमुख पक्ष च्या पदाधिकारी यांची बैठक मा.प्रांत अधिकारी विनय गोसावी साहेब, मा. नगराध्यक्ष भैय्या सो  रमेश परदेशी ,सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील सोनवणे साहेब, देवरे साहेब, कार्यालयीन अधिक्षक धुमाळ साहेब ,यांच्या उपस्थिती मध्ये शांततेत समितीची बैठक  आयोजित करण्यात आली होती,

यावेळेस बोलताना एरंडोल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री स्वप्नील उनवणे साहेब म्हणाले कीCovid-19 मध्ये उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांनी नगरपालिका व स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळाने  नगरपालिका व स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार परवानगी घेणे आवश्यक राहील.
ते पुढे म्हणाले की यावर्षी सार्वजनिक गणेश मंडळाचे श्री गणेश मूर्ती 4 फूटा पर्यंत असावी व घरगुती श्रीगणेशाची मूर्ती 2 फूटा पेक्षा जास्त नसावी शक्यतो पारंपरिक गणेश मूर्ती ऐवजी घरातील धातू संगमरवर आधीच मूर्तीचे पूजन करावे.

मूर्ती शाडूची पर्यावरण पूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृतीम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे. गणेश मूर्तींचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास या मूर्तींचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनाच्या वेळी किंवा 2021 भाद्रपद महिन्यात पुढील वर्षाच्या विसर्जनाच्या वेळी करता येणे शक्य आहे जेणेकरून आगमन विसर्जनासाठी गर्दी जाणे टाळून स्वतः व कुटुंबीयांचे साथीच्या रोगांपासून रक्षण होईल.उत्सवाकरिता वर्गणी देणगी स्वेच्छेने दिली तरच त्याचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पाहावे तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.

सांस्कृतिक कार्यक्रम ऐवजी आरोग्यविषयक उपक्रम शिबिरे रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरणा मलेरिया डेंग्यू इत्यादी आजार बाबत दंडात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी .श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन केबल नेटवर वेब-साईट वर फेसबुक द्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी .गणपती मंडळांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात यावे तसेच त्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ घेऊ इच्छिणाऱ्या भाविकासाठी शारीरिक अंतराचे फिजिकल डिस्टिन तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे असे सांगितले.

पुढे नगराध्यक्ष यांनी सांगितले की यावेळेस नगरपालिका मार्फत संपूर्ण गावामध्ये गणपती विसर्जन नगरपालिकेने आपल्या घराजवळ आलेल्या विसर्जन वाहनांमध्ये श्रीगणेशाची मूर्ती  आणून देणे जेणेकरून गर्दी होणार नाही यावेळेस स्वप्नील सोनवणे साहेब यांनी मांडलेल्या प्रस्तावाला गावातील सर्व मंडळांनी संमती दिली.
यावेळेस इतर पदाधिकारी व पत्रकार बंधु उपस्थित होते.
close