shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा परिषदेतर्फे आंतरजातीय विवाह करणाऱ्या १६० जोडप्यांना धनादेशाचे वाटप..!!आर्थिक सहाय्य योजना, प्रत्येकी ५० हजार वाटप...!!

गडचिरोली ता.५ :- 
आंतरजातीय विवाह करणाऱ्या जिल्ह्यातील १६० जोडप्यांना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे प्रत्येकी ५० हजार रुपयांचा धनादेश देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. जि. प. च्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. चे अध्यक्ष अजय कंकडालवार होते. प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष मनोहर पोरेटी , अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी फरेंद्र कुतीरकर , समाजकल्याण सभापती रंजिता कोडापे, कृषी व पशुसंवर्धन सभापती रमेश बारसागडे , जि. प. सदस्य गीता कुमरे , लता पुंगाटी, समाजकल्याण अधिकारी माणिक चव्हाण आदी उपस्थित होते.
आंतरजातीय विवाह हे जातिभेद दुर करण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगून उपस्थित जोडप्यांचे अजय कंकडालवार यांनी कोतुक केले.१२ जानेवारी १९९६ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील जातीयता व भेदभाव कमी करण्यासाठी व जवळीक निर्माण करण्यासाठी आंतरजातीय विवाहीत जोडप्यांना अर्थसहाय्य देण्याची योजना सुरू केली. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. सदर धनादेश पती-पत्नी संयुक्त नावांने प्रदान केला जातो.

 जि. प. च्या समाजकल्याण कार्यालयात आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचे २४५ अर्थसहाय्य योजनेचे प्रस्ताव प्राप्त झाले. त्यापैकी उपलब्ध निधीनुसार १६० जोडप्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यासाठी ७९.८५. लक्ष रूपये खर्च करण्यात आले आहेत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजकल्याण अधिकारी माणिक चव्हाण यांनी केले. संचालन विस्तार अधिकारी रतन शेंडे, तर आभार समाजकल्याण निरीक्षक अमोल श्रीमनकार यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नीलेश तोरे, रामेश्वर दरडे, प्रमोद ढगे, भास्कर दोनाडकर, नरेश नाईक यांनी सहकार्य केले.
close