पाटण । प्रतिनिधी (महेश मस्कर ):
गणरायाचे आगमन अगदी साध्या पध्दतीने झाले असले तरी लोकांची भक्ती आणि श्रध्दा ही कधीही कमी झालेली दिसत नाही. प्रशासनाच्या नियमांचे पालन करत महाराष्टामध्ये गौरी गणपती सण साजरा होत आहे.
तसेच,पाटण तालुक्यातील मस्करवाडी नं२ या छोट्याशा गावामध्ये अनोखा उपक्रम राबविला जात आहे. गणपती बाप्पाच्या आगमन झालेल्या दिवसापसून गावामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी ह.भ.प बाबुराव महाराज भोसले यांच्या मार्गदशनाखाली हरिनामाचा गजर पार पाडला जात आहे.गावामध्ये वातावरण अगदी भक्तिमय होत असलेले पाहायला भेटत आहे. सर्वत्र बाबुरव महाराज आणि त्यांचे भजनी मंडळाचे कौतुक होत आहे.

