सोनई । प्रतिनिधी (मोहन शेगर) :
नेवासा येथील कोविड केयर सेंटरला नामदार शंकरराव गडाख यांची भेट,ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली.या बैठकीत नेवासा तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संदर्भात व कोरोनाच्या बाबत अंमलबजावणी व उपाययोजना करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला.नेवासा तालुक्यातील जनतेने कोरोनाला घाबरून न जाता शासन नियमांचे पालन करून कोरोना विरोधात लढा देण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन करून त्यांनी शनिशिंगणापूर येथे पुढील उपचाराच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा तैनात करण्यात आली असल्याची माहिती नामदार शंकरराव गडाख यांनी यावेळी बोलताना केले.
नेवासा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी यांनी नेवासा तालुक्यातील कोरोनाच्या सद्य स्थितीबाबत माहिती दिली.तसेच प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन व तहसीलदार रुपेश सुराणा यांनी ठोस उपाय योजना करण्याच्या दुष्टीने सूचना केल्या.यावेळी बोलताना नामदार शंकरराव गडाख म्हणाले की नेवासा तालुक्यात आठ दिवसांपासून ३० ते ४० गावात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे. नेवासा शहर,सोनई व सलबतपूर येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहे. कोविड सेंटर मध्ये जे बाधित रुग्ण आहेत, त्यांना सामाजिक अंतर राखत आज भेटलो त्यांच्याशी चर्चा करून मानसिकता भक्कम करण्याच्या दृष्टीने हितगूज केले.कोरोना बाबत कोणीही घाबरून जाऊ नका,धाडसाने पुढे जावे लागणार आहे. आज कोविड सेंटर मध्ये ७९ जणांची तब्येत व्यवस्थित आहे. पुढील दुष्टीने ५०० ते ६०० बेडची व्यवस्था झाली असून शनिशिंगणापूर व वडाळा हॉस्पिटलमध्ये १०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
शिंगणापूर येथे सर्व सुविधा असल्याने व नगर इस्पितळात भरलेले असल्याने शासन व शिंगणापूर यांच्या वतीने उपचार करणार आहे.कोविड बाबत कोणीही राजकारण न करता सर्वांनी एकत्रित येऊन कोरोनाच्या विरोधात लढा द्यायचा आहे. मास्क घालून सोशल डिस्टनसिंगचे पालन करणे, नियम पाळणे हाच पर्याय रहाणार असल्याने त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावा असे आवाहन केले.नेवासा नगर पंचायत च्या प्रांगणात काल लॉकडाऊन संदर्भात बैठक बोलवण्यात आली होती. त्याबाबत ही नामदार गडाख यांनी आढावा घेतला.नगरपंचायत बाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा असे ही त्यांनी सूचित केले.पुढील काळात प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने त्याला कंट्रोल होण्याच्या दुष्टीने प्रयत्न करावा. तसेच तालुक्यात वाईटातील वाईट परिस्थिती उदभवू शकते. त्यादृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी झालेल्या बैठकीप्रसंगी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन,तहसीलदार रुपेश सुराणा,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी,उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील,सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार,गटविकास अधिकारी शेखर शेलार,नगरपंचायतचे मार्गदर्शक सतीश पिंपळे,मुख्याधिकारी समीर शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ.रविंद्र कानडे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मच्छिंद्र बनसोडे,कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे,नेवासा तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

