shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीराम जय राम ..जय जय राम...! जय घोषणानी मंदिर परिसर धुमधूमला ...!

कारसेवकाच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित  झाला .


खर्डा प्रतिनिधी-
पाचशे वर्षापासून प्रलंबित  असलेल्या आयोध्य मध्ये प्रभू श्रीराम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले. अयोध्या येथे मंदिराचा भूमिपूजन सोहळा झाल्याचा आनंद खर्डा येथील राम मंदिरात मोठ्या भक्तिमय वातावरणात व फटाक्यांच्या आतषबाजी करून जल्लोषात साजरा करण्यात आला राम मंदिरातील मूर्ती गंगाजलाने स्नान घालून अभिषेक करून प्रभू श्रीरामाची पूजा करण्यात आले आणि  छत्रपती शिवाजी महाराजाची पूजन करून प्रसादाचे वाटप करण्यात आले .


गेल्या तीन दशकापासून देशातील हिंदु समाजाची जी भावना होती ती आज या देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आज राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे.लोकसभेच्या निवडणुकीला या देशातील हिंदू बांधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत दिले होते ते मत आज  सार्थकी लागले अशी भावना या देशातील नागरिकांनी व्यक्त केले आहे.

यावेळी मंदिर सजवण्यात आले होते,अयोध्येत भव्य दिव्य प्रभु श्रीराम मंदिराचे भुमीपुजन होत असल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित झाला होता .यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे, माजी जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल  खिवंसरा,सरपंच संजय गोपालघरे, वैजीनाथ पाटील ,राजू गोलेकर,अजित लोळगे कारसेवक नागराज पानगावकर ,प्रदीप ढगे,सुधीर जमकावळे,रघुनाथ गोलेकर ,प्रकाश दिंडोरे,आसाराम लद्दड ,दादा वडे,धनसिंग साळुंखे, रोहित भंडारी,गणेश काळे , बंडू चावणे ,महेश भोसले ,भागवत सुरवसे, ग्रा सदस्य संतोष थोरात, गणेश डाडर,रामकिसन वाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद,शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कार्यकर्ते, भाजप,शिवसेना , पदाधिकारी सह राम भक्त उपस्थित होते.
-------------------------------


close