shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथे जिल्हा परिषद सदस्य अंकिता ताई पाटील यांच्या हस्ते साई स्टील अँड फेब्रिकेशन चे उद्घाटन..!!


इंदापूर प्रतिनिधी /तात्याराम पवार 
इंदापूर दि. 29 ऑगस्ट 2020 रोजी साई स्टील अँड फेब्रिकेशन चे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य अंकिता ताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले 
या कार्यक्रमाच्या वेळी अंकिता ताई म्हणाल्या की सध्या बहुतांशी लोकांना असे वाटते की एक मोठ्या पगाराची नोकरी असावी, कारण साधारण आठ तासाच्या नोकरी मधे एक फिक्स पगार मिळत असतो आणि रिस्क पण कमी असते, पण एक तात्विक विचार केला तर ज्या ठिकाणी आपण नोकरी करत असतो त्या व्यवसायाचा मालक स्वतःच्या जिद्दीने आणि आत्मविश्वासाने व्यवसाय चालवत असतो आणि आपण मात्र तीथे नोकरी करत असतो. तुमच्या कड़े जर जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर स्वतःचा व्यवसाय चालू करुण एक अनोखे विश्व तुम्ही निर्माण करू शकता.


साई स्टील अँड फॅब्रिकेशन नवीन लेखन ची उद्घाटन असेच जिद्दी युवक मिरताज सय्यद यांनी चालू केलेला "साई स्टील ॲण्ड फॅब्रिकेशन" या नवीन वर्कशॉप चे आज उद्घाटन केले व पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मिर्ताज सय्यद हे वडापुरी येथील रहिवासी असून फॅब्रिकेशन व्यवसायात गेली वीस वर्षापासून अतिशय हलकी तून 0बजेट मधून व्यवसाय करीत आहेत सदर सय्यद हे अतिशय कष्टाळू व जिज्ञासू असून त्यांच्या या हाताखाली अनेक तरुण रोजगार यावसाय शिकून मोठे झाले व त्यामुळेच त्यांनी मोठा व्यवसाय निर्माण केला खरच सय्यद यांचा हा मदतीचा मनमिळावू पणा समाजातील तरुण युवकांना एक आदर्श आहे नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करून आपले करियर सिद्ध करून दाखवणे हे कर्तृत्व शील आदर्श त्यांनी मांडला आहे . त्यांच्या या नवीन फॉर्म चे उद्घाटन झाले.यावेळी  साई फॅब्रिकेशन चे मालक व वअलिशान पत्रा कंपनी चे पार्टनर रहिमान भाई शेख, सुरवड ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब कोरडकर, खुदबुददिन शेख, साई स्लाइडिंग चे मालक मुन्ना शेख, नॅशनल अटोऑटो स्विच चे मालक अलताफ भाई शेख व इजगूडे नाना अलिशान फरशी &हार्ड वेअर निमगाव केतकी चे मालक सादिक शेख, शब्बीर भाई शेख व इतर मित्र परिवार उपस्थित होते.
close