shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साईआश्रया परिवार शिर्डी येथे साई चरित्र पारायण सोहळा संपन्न ..!!



शिर्डी प्रतिनिधी:
कु.किरण जाधव

सबका मालिक एक प्रतिष्ठान संचलित साईआश्रया परिवार साई निवारा येथे दिनांक 24 जुलै ते 31 जुलै पर्यंत साई चरित्र पारायण व भव्य साई कथामृत सोहळा साई कथाकार ह. भ. प.बाळकृष्ण महाराज सुरासे यांच्या मुखातून हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी  प्रमुख अतिथी म्हणून माननीय सौ सुहासिनी ताई ओम प्रकाश कोयटे (समता परिवार)व रुई ग्रामपंचायतचे सरपंच  माननीय श्री संदीप भाऊ वाबळे , तंटामुक्ती अध्यक्ष  भाऊराव शिरसाठ, सदस्य सुराळे* यांच्या शुभहस्ते  दीप प्रज्वलन व ध्वजारोहण करण्यात आले तसेच माननीय श्री पंकज भाऊ लोढा* यांनी 20 साई चरित्र ग्रंथ साई आश्रयाला भेट दिले.

 सर्वत्र कोरोना महामारी संसर्ग असल्यामुळे हा कार्यक्रम फक्त साई आश्रया परिवारासाठी मर्यादित होता 
 या कार्यक्रमाद्वारे महाराजांनी आपल्या सुमधूर आवाजाने साईबाबांच्या कथा व भजने गायली व सर्वांना मंत्रमुग्ध केले तसेच साईआश्रय येथील मुलांनी गंगागिरी महाराज व साईबाबा यांची भेट, साई पालखी सोहळा , हंडी प्रसाद, बेटी बचाव, साई भोला भंडारी तसेच दीपोत्सव* असे कार्यक्रम सादर केले तसेच साई आश्रयाची सर्व सत्य परिस्थिती सांगितले अशाप्रकारे निसर्गरम्य वातावरणात अतिशय आनंदाने साई चरित्र पारायण व साई कथामृत सोहळा पार पडला शेवटच्या दिवशी काल्याचे किर्तन व  ग्रंथदिंडी काढण्यात आली  यावेळी साईआश्रया वर प्रेम करणारे, भेट देणारे ,मार्गदर्शन करणारे, सहकार्य करणारे, अन्नदाते अशा सर्व दानशूर देव माणसांचे आभार मानण्यात आले व शेवटी साईबाबांना प्रार्थना करण्यात आली

साईअश्रया परिवारावर नेहमी साईबाबांनी कृपा आशीर्वाद दिलेला आहे तेव्हा सर्वांचे या कोरोना महामारी संसर्गापासून रक्षण करावे अशाप्रकारे श्रावण मासानिमित्त साई चरित्र पारायण व साई कथामृत सोहळा अतिशय आनंदाने व भक्तिमय वातावरणात पार पडला या कार्यक्रमासाठी साई आश्रयातील शिक्षक अजय तिवारी संतोष लोणारे फारुक शेख हर्ष मॅडम स्वच्छता सेवक नीलम गुप्ता सुनिता मावशी मोहन मोरे हेमंत आकाश वाघमारे व सर्व मुले-मुली आजी-आजोबा या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप कष्ट घेतले.
यावेळी साई आश्रया परिवाराचे संस्थापक अध्यक्ष गणेश दळवी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
close