सावळिविहीर । प्रतिनिधी :
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान च्या श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल मध्ये विविध रुग्णांवर माफक व योग्य उपचार होत असल्यामुळे येथे राज्यातून विविध भागातून रुग्ण दाखल होत असतात.मात्र दाखल होताना त्यांचा कोरोना तपासणी करण्यात येते ,प्रथम अहवाल निगेटिव येतो. मात्र नंतर ८ते१० दिवसांनी तो पॉझिटिव्ह आल्याचे एका प्रकरणावरून उघडकीस आले आहे.
शिर्डी येथील श्री साई संस्थांनच्या सुपर हॉस्पिटलमध्ये सटाणा येथील एक रुग्ण वेगळ्या प्रकाराने आजारी पडला असताना त्याची शस्त्रक्रिया येथे करण्याचे ठरले होते .या रुग्णाला सुपर हॉस्पिटल मध्ये प्रथम दाखल करताना त्याची कोरोना तपासणी करण्यात आली होती. ती निगेटिव निघाली होती. मात्र आठ दिवसाने त्याची शस्त्रक्रिया करण्याचे ठरले होते,व आज या रुग्णांची शस्त्रक्रिया होती.मात्र शस्त्रक्रियेला नेण्यात्पूर्वी त्यांची कोरोना तपासणीकरण्यात आली. मात्र या वेळी हा रुग्ण बाधित आढळून आला आहे सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करताना या रुग्णाची कोरोणा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र आठ दिवसांनी तो पॉझिटिव्ह आला आहे.ह्या रुग्णावर येथील सुपर हॉस्पिटल मधील डॉक्टर उंबरकर यांच्याकडे उपचार सुरू होता. मात्र ह्या रुग्णाचा अगोदर कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह व नंतर पॉझिटिव आल्याने डॉक्टर उंबरकर यांच्यासह त्यांच्या वार्डातील सर्व कर्मचारी यांच्यामध्ये ही एक प्रकारे असुरक्षिततेची भीती निर्माण झाली आहे.
या कोरोना बाधित निघालेल्या हॉस्पिटलमधील या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सहा जणांचा स्राव आरोग्य तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे ,यामुळे येथून पुढे रुग्ण दाखल झाल्यानंतर या रुग्णाची कोरोना तपासणी वेळोवेळी होणेही गरजेचे आहे .कारण या रुग्णांवर विविध उपचार करणारे डॉक्टर्स ,आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी ,यांचीही सुरक्षा महत्त्वाची ठरणार आहे, यासाठी आता प्रयत्न होणे गरजेचे आहे.


