सोनई । प्रतिनिधी (मोहन शेगर )➤
सोनई ता.नेवासा येथे आज गुरुवारी दि.13 घेण्यात आलेल्या रॅपीड ॲटीजेन टेस्ट मध्ये सोनई परिसरात 8 जण कोरोना बाधित रूग्ण सापडले असल्याची माहिती सोनई येथील आरोग्य अधिकारी डाॅ.राजेंद्र कसबे यांनी दिली आहे.काल दहा व आज आठ असे दोन दिवसात अठरा रूग्ण सापडल्याने सोनईकरांमध्ये धाकधुक वाढली आहे. तरी सोनई गावामध्ये दुकानात गर्दी वाढत आहे.
नागरिक सोशल डिस्टन्स व मास्कचा वापर करताना दिसत नाही.तर काही ठिकाणी घोळके बसल्याचे आढळतात.सध्या पोलिस यंञणा पण कोरोनाच्या पार्श्वभुमीवर व सततच्या कामाच्या दगदगीमुळे थोडी थंडावली आहे. ग्राम कोरोना समितीचे पण गावातील घडामोडीकडे लक्ष नसल्याचे दिसते.यामुळे सोनई परिसरातील नागरिकावर वचक राहिला नसल्याचे दिसत आहे. तरी एवढया प्रमाणात रूग्ण सापडत असताना प्रशासन परत लाॅकडाऊन करणार का? याबाबत पण प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.