shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गोंदिया जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ४०८

  • नवे २२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
  • १२ रुग्णांची कोरोनावर मात




गोंदिया / प्रतिनिधी  सचिन श्यामकुंवर..दि.३   :.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचे आढळून येणाऱ्या बाधित रूग्णांच्या संख्येवरुन दिसून येत आहे.आज ३ ऑगस्ट रोजी नवीन २२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.तर बारा रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहे.



जिल्ह्यात कोरोना क्रियाशील रुग्ण १४३ आहे. कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत असल्याचे आज प्रयोगशाळेच्या अहवालावरून पुन्हा सिद्ध झाले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ४०८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. क्रियाशील  रुग्णांची संख्या १४३ झाली आहे. २४२ रुग्ण आतापर्यंत कोरोनावर मात करून घरी परतले आहे. आज ज्या बारा रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे,त्यामध्ये देवरी तालुक्यातील अकरा आणि सडक-अर्जुनी तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.

आज नवीन २२ रुग्ण आढळून आले आहे. या रुग्णांपैकी सर्वाधिक १५ रुग्ण हे  गोंदिया शहरातील आहे. यामध्ये  रेलटोली येथील एक,सिंधी कॉलनी येथील ९ ,श्रीनगर येथील एक, हनुमाननगर येथील एक,सिंगापूरवरून आलेली एक व्यक्ती आणि दोन व्यक्ती ह्या बिहार येथून आलेल्या आहेत. अर्जुनी/ मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथे दोन रुग्ण आढळून आले आहे. एक रुग्ण हा सालेकसा येथील असून तो यवतमाळ येथून आलेला आहे. दोन रुग्ण हे देवरी येथील आहेत. एक रुग्ण तिरोडा येथील तर एक रुग्ण आमगाव तालुक्यातील चिरचाळबांध येथील आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू प्रयोगशाळेत आजपर्यंत तपासणीसाठी एकूण ९८०७ नमुने पाठविण्यात आले. यातील ९१८५ नमुने निगेटिव्ह आढळले तर ३९० नमुने पॉझिटिव्ह आढळले आहे.९४ नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित आहे.तर १३८ नमुन्यांच्या अहवालाबाबत अनिश्चितता कायम आहे.

 चार कोरोना बाधित रुग्ण हे जिल्ह्याबाहेर बाधित आढळले आहे.गोंदिया येथील प्रयोगशाळेतून ३९० आणि रॅपिड अँटिजेन टेस्टमधून तेरा असे एकूण ४०८ बाधित रुग्ण आढळले आहे.

विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात १९३ व्यक्ती आणि गृह विलगिकरणात ७७९ व्यक्ती अशा एकूण ९७२ व्यक्ती विलगिकरणात आहे. ह्या सर्व व्यक्ती प्रशासनाच्या देखरेखीखाली असून आरोग्य विभागाचे कर्मचारी त्यांची भेट घेऊन त्यांच्यावर उपचार करीत आहे.

बाधित रुग्णांचा तात्काळ शोध रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २५६९ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले.यामध्ये २५५५ अहवाल निगेटिव्ह आले आहे. १४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी १२० चमू आणि ६० सुपरवायझर ५० कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे.

गोंदिया जिल्ह्यातील ज्या गावात आणि आणि नगर पालिका क्षेत्रात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे तो भाग कंटेंटमेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.जिल्ह्यात असे ५० क्रियाशील कॅटेंटमेंट क्षेत्र आहे.यामध्ये गोंदिया तालुक्यात चांदणीटोला, कुडवा,गोंदिया येथील यादव चौक,सिव्हिल लाईन.रेल्वे लाईन,श्रीनगर व सिंधी कॉलोनी. सालेकसा तालुक्यातील भजेपार, पाउलदौना,रामाटोला व तितेपार. देवरी तालुकयातील देवरी शहरातील वार्ड क्रमांक ५,८,९,१० आणि आखरीटोला,परसटोला,भागी व गरवारटोली.सडक/अर्जुनी तालुक्यातील हलबीटोला,डव्वा व काटेकुर्रा.गोरेगाव तालुक्यातील घोटी.
तिरोडा तालुक्यातील वडेगाव, मुंडीकोटा,सतोना,लाखेगाव,माली, लोणार,खैरबोडी,गुमाधावडा,
गोंडमोहाडी,पाटीलटोला,इसापूर,
सेजगाव,पालडोंगरी,पिपरिया, उमरी,
पांजरा,तिरोडा शहरातील न्यू सुभाष वार्ड,किल्ला वार्ड, नेहरू वार्ड,गुरुदेव वार्ड व न्यू बेलाटी/खुर्द.अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी,सिंगलटोली,ताडगाव व वडेगाव आणि आमगाव तालुक्यातील तिगाव आणि चिरचाळबांध आदी गावे आणि वार्डचा या कंटेनमेंट क्षेत्रामध्ये समावेश करण्यात आला आहे.



काळजी घ्या
अंतर ठेवा
मास्क बांधा
सुरक्षित राहा

close