shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नांदेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटम्बना केलेल्या दोषिंना तात्काळ अटक करा ..!!

येवला येथील ब्लू पँथर सामाजिक संघटनेची मागणी.!!


नाशिक विभाग । प्रतिनिधी संजय गांगुर्डे ➤
ता. 10: नांदेड जिल्ह्यातील माळेगांव यात्रा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटम्बना केल्याने येवला येथील ब्लू पँथर सामाजिक संघटना यांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करुन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी व त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी अशा मागणीचे निवेदन येवला येथील तहसीलदार रोहिदास वारुळे यांना निवेदन देण्यात आले. समाज्यामधे अश्या प्रकारच्या समाजकंटक प्रवृत्तीला चाप बसणे  गरजेचे आहे असे मत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुभाष गांगुर्डे यांनी व्यक्त केले.

येवला : येथील तहसीलदार यांना निवेदन देताना ब्लू पँथर सामाजिक संघटनेचे अध्यक्ष व कार्यकर्ते


निवेदनावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष गांगुर्डे, महेंद्र हिरे,गौतम लाठे, प्रवीण नेतकर, सिद्धार्थ त्रिभुवन,युवराज पगारे, गोरख गांगुर्डे,संदीप जोंधळे, आकाश भालेराव, मिलिंद गांगुर्डे शुभम गायकवाड, विशाल ठोंबरे आदिं सह संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्या आहेत. स्वाक्षरीने



close