लातूर । रवि बिजलवाड
ऑगस्ट ०९ / लातूर शहर: कोरोना योध्या चा जन्मदिवस साजरा.
लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील लॅब टेक्निशियन वाजीदजी सय्यद हे कोरोनावर मात करून पुन्हा लातूरकरांच्या सेवेत रूजू झाले आहेत.
काल त्यांचा जन्मदिवस आरोग्य विभागाच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित राहून वाजीदजी यांना जन्मदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. सोबत महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर श्री चंद्रकांतजी बिराजदार, आरोग्य अधिकारी डॉ सुधाजी राजूरकर, क्षेत्रीय अधिकारी श्री संजयजी कुलकर्णी व आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते..

