shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांवात शिवसेनेकडुन भाजप प्रणित कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

हिंगोली/प्रतिनीधी (विश्वनाथ देशमुख)
दि.०९,कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हटविल्याबद्दल हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव येथे शिवसेनेतर्फे निषेध नोंदवण्यात आला व भाजप प्रणित कर्नाटक सरकारचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.


सेनगांव शहरातील श्री आप्पास्वामी प्रवेशद्वाराजवळ आज दि.०९ आँगष्ट रविवार रोजी दुपारी संतप्त शिवसैनिक एकत्र जमुन भाजपा प्रणित कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत भाजपा प्रणित कर्नाटक सरकारचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी हिंगोली शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख, शहरप्रमुख जगन्नाथ देशमुख, तालुका समन्वयक हेमंत संघई,युवासेना उपजिल्हाप्रमुख अनिल अगस्ती, चेअरमन वैभव देशमुख, युवासेना शहरप्रमुख संतोष गाढवे, नगरसेवक मंगेश पवार, अनिल महाजन, राजु देशमुख,प्रशांत देशमुख, गणेश रंजवे,सचिन जाधव,जीवन देशमुख आदी शिवसैनिक उपस्थित होते.
close