अहमदनगर, दि. 06- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संगठन (ईपीएफओ) अहमदनगर कार्यालयातर्फे आज नोंदणीकृत आस्थापनांसाठी कोविड -19 च्या साथीची परिस्थिती लक्षात घेऊन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.
अहमदनगरच्या प्रमुख आस्थापनांनी यात भाग घेतला आणि पंतप्रधान गरीब कल्याण योजनेसह कर्मचार्यांनी ई-नॉमिनेशन/E-NOMINATION (वारस) नोंदणी करण्याची पद्धतही स्पष्ट केली. जिल्हा कार्यालय अहमदनगरच्या कार्यक्षेत्रातील सर्व कर्मचार्यांना ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे आणि त्यांच्या मालकांनाही या प्रक्रियेत कर्मचाऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
कोविड -19 लॉकडाउनच्या दरम्यान ईपीएफओ.अहमदनगरने भागधारकांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या व्हाट्सएप हेल्पलाईनचा आतापर्यंत 350 हून अधिक सभासद, निवृत्तीवेतनधारक आणि नियोक्ते यांना फायदा झाला आहे. ज्या कर्मचाऱ्यांना/सभासदांना अहमदनगर पी एफ कार्यालया मार्फत मार्गदर्शन हवे असेल तर तो 9422041289 हेल्पलाईनवर व्हॉट्सअॅप संदेश पाठवून या सुविधेचा लाभ घेऊ शकेल. ईपीएफओ सदस्यांच्या बहुतांश सेवा आजतागायत ऑनलाईन झाल्या आहेत. परंतु ही सुविधा मिळण्यासाठी कर्मचार्यांना त्यांचा यू.ए.एन. आधार कार्ड सोबत संलग्न करणे आवश्यक आहे. कोरोना साथीच्या काळात स्मार्टफोनच्या मदतीने घरी ऑनलाईन सेवा मिळू शकतात, असे कळविण्यात आले आहे. ****


