गडचिरोली : जिल्हाधिकारी कार्यालयातील एक कर्मचारी कोरोना बाधित..!!
गडचिरोली ता.२३ :- जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी विभागातील एक कर्मचारी कोरोना बांधीत आढळून आला आहे. तर जिल्ह्यात आज ५ जणांना कोरोणाचा संसर्ग झाला आहे. तर ८ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
नव्याने पाच कोरोना बाधित आढळले त्यात गडचिरोली येथील विलगीकरणात ठेवलेले ३ जण यामध्ये नवेगाव येथील रहिवासी असलेला जिल्हाधिकारी कार्यालयातील १ कर्मचारी, नागपूरवरुन आलेला १, स्थानिक एकाचा समावेश आहे. आरमोरी येथील एक परिचारिका व नागपूर येथून आलेला एका प्रवाशांचा समावेश आहे. ८ जण कोरोनामुक्त झाले त्यात गडचिरोलीतील २, सिरोंचा, कोरची, धानोरा, एटापल्ली, भामरागड, चामोर्शी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात ८९४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ७९७ रुग्ण आजारातून बरे झाले आहेत. सध्या जिल्ह्यात ९६ जणांवर उपचार सुरू आहेत.

