shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माऊली विद्यालय जवळबन येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ......!!

केज । प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे)  :-   
केज तालुक्यातील जवळबन येथील माऊली विद्यालयात एस एस सी परिक्षा मार्च २०२० उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन  करण्यात आला. 
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालासाहेब भाकरे शाळेचे मुख्याध्यापक सौ. कापसे, शिवाजी हजारे सर, एल. बी. पवार, शंकर सोळंके सर उपस्थित होते. माऊली विद्यालय जवळबनच्या  यशस्वी होण्याची परंपरा या वर्षी पण कायम ठेवल्या बद्दल सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून व पूढील शिक्षणासाठी शुभेच्छा देऊन शिवाजी हजारे सर यांनी आभार व्यक्त केले.

 गुणवंत विद्यार्थी पूढील प्रमाणे १) प्रथम  :- कु. करपे रोहिणी परशुराम ८९ . २०%  २ ) द्वितीय  :- कु. रंदवे वैष्णवी अरूण ८५.००%  ३ ) तरतीय :- कु. दुनघव अंजली अंबादास ८४.४०%  . संस्थेची व माऊली विद्यालय जवळबनची यशस्वी होण्याची परंपरा जपल्या बद्दल संस्थेचे सचिव मा. रमेशराव आडसकर यांनी विद्यार्थ्यांचा व शिक्षक कर्मचारी यांचा सत्कार करून या पूढील काळातही संस्थेचे नाव मोठे करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरीक दादासाहेब भाकरे पाटील व बाळू करपे यांनी मेहनत घेतली.

close