shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठकने राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या

२०२० हे वर्ष टीव्ही, चित्रपट इंडस्ट्रीसाठी हे काळवर्ष ठरले. कारण या वर्षी अनेक कलाकारांच्या मृत्युच्या बातम्या समोर येत आहेत. सुशांत सिंह नंतर टीव्ही अभिनेता आणि मॉडेल समीर शर्माने आत्महत्या केल्याचे समोर आले होये.

त्यानंतर आता आणखीन एका अभिनेत्रीने मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठकने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.



४० वर्षांच्या अनुपमाच्या अशा अचानक एक्झिटने मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. अनुपमाने आत्महत्येच्या एक दिवस आधी फेसबुक लाईव्ह केले होते. अनुपमा पाठक हिने वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्या केल्याचे समजत आहे.

अनुपमाने गळफास लावून आत्महत्या केली. एवढे मोठे पाऊल उचलण्यापूर्वी अनुपमाने एक सुसाइड नोटही सोडली असून, त्यात तिने फाशी घेण्याची कारणे दिली आहेत. यामध्ये तिने आर्थिक समस्येमुळे आत्महत्या करत असल्याचे सांगितले आहे.


आत्महत्येसाठी दिलेल्या पहिल्या कारणाबाबत ती म्हणाली होती की, ‘मनीष झा नावाच्या व्यक्तीने लॉकडाऊन दरम्यान मे महिन्यात आपली दुचाकी घेतली होते. त्यावेळी आपण आपल्या गावी होते. मात्र आपण मुंबईमध्ये परत आल्यावर मनीषने ती गाडी परत देण्यास नकार दिला.’

दुसरे कारण देताना ती म्हणाली होती की, ‘डिसेंबर २०१९ मध्ये एका प्रॉडक्शन कंपनीत तिने १० हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये हे पैसे व्याजासहित परत येणे होते. मात्र त्याबाबत आपली फसवणूक झाली व हे पैसे मिळाले नाहीत.’

याबाबत काशिमीरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पीआय संजय हजारे म्हणाले, ‘आम्ही या प्रकरणाचा तपास करीत आहोत. मात्र सर्व वस्तुस्थितीचा तपास पूर्ण झाल्यानंतरच दोषींवर कारवाई केली जाईल.’

चित्रपट इंडस्ट्रीसाठी हे वर्ष खरच खुप वाईट आहे. यापूर्वी कुशल पंजाबी, सेजल शर्मा, सुशांतसिंह राजपूत, समीर शर्मा आणि मनमीत ग्रेवाल अशा कलाकारांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
close