सोनई । प्रतिनिधी: मोहन शेगर ➤
देशाच्या 74 व्या स्वातंञ्य दिनी सोनई ता.नेवासा येथील ग्रामपंचायत मध्ये रक्तदान शिबीर घेण्यात आले तसेच कोविड योद्धाचा सत्कार करण्यात आला.सोनईत यावेळी सुमारे तीस पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली देशभक्ती व कोरोनाच्या महामारीत देशाप्रती असलेली कर्तव्य भावना दाखवुन दिली.यावेळी सोनईतील अशोका ज्ञानदिन फाॅडेंशन व ग्रामपंचायत सोनई यांच्या वतीने हे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.अहमदनगर येथील अर्पन रक्तपेढीच्या प्रमुख डाॅ.भाग्यश्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टिमचे सदस्य दिक्षा शिंदे,शितल देवकर,सिदार्थ शहाणे इत्यादींनी सकाळी नऊ ते पाच वाजे पर्यंत रक्तदात्याचे रक्त संकलन करण्याचे काम सोनई ग्रामपंचायत हाॅल मध्ये केले.
यावेळी सोनई ग्रामपंचायतच्या वतीने सर्व कोविड योद्धाचा सत्कार अशोका ज्ञानदिप फाॅडेंशनचे संस्थापक सचिव संदिप कुसळकर,ग्रामपंचायत सदस्य सखाराम राशिंनकर, दै.भास्करचे पञकार संदिप दरंदले,खंडागळे मामा पत्रकार, मोहन शेगर पत्रकार ,निवेदक विशाल पुरी यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी सत्काराला उत्तर देताना अहमदनगर अर्पन रक्तपेढीच्या प्रमुख डाॅ.भाग्यश्री पवार म्हणाल्या सध्या कोरोनाच्या महामारीत रक्ताचा पुरवठा कमी पडत आहे.यामुळे आपल्या सोनई गावाने लाॅकडाऊन मध्ये तीनदा मोठे शिबीर आयोजित करून देशसेवा केली आहे.आम्ही आपल्याला अतिगंभीर प्रसंगी रक्ताची गरज लागली तर हमखास मदत करू.यापुढेही आम्ही रक्तदान शिबीरे आयोजन करून देशाप्रती असलेली कर्तव्य भावना दाखवु असे संदिप वक्तव्य सामाजिक कार्यकर्ते संदिप कुसळकर यांनी केले.विशाल पुरी यांनी सुञसंचालन केले.यावेळी सर्व रक्तदात्यांना व स्वयसेवकांना चहा फराळाचे नियोजन करण्यात आले होते.