shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपळे गुरव येथील मोरया पार्क जवळ १३ वर्षाच्या मुलीचा डंपरखाली चिरडून जागीच मृत्यू … हृदय द्रावक घटना!

पिंपरी चिंचवड :-
पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव, मोरया पार्क येथे एका डंपरने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दुचाकीवर मागे बसलेली मुलगी डंपरच्या मागच्या चाकाखाली पडली तिच्या तोंडावरून डंपरचे चाक गेल्याने ती जागेवरच मरण पावली. ही घटना मात्र हृदय पिळवटून टाकणारी होती.



संजय साफरीया व त्यांची मुलगी रा. चिखली दोघे जण पिंपळे गुरव येथील मोरया पार्क मधील अक्षदा क्लिनिक जवळील भरत परमार यांचेकडॆ आले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास संजय साफरीया व मुलगी विभूती साफरिया दुचाकीवरुन चिखलीला निघाले असंता मोरया पार्क येथील मेन रोडवर येताच डंपरने धडक दिल्यामुळे मागे बसलेल्या विभूती साफरिया ( वय १३) ही डंपरच्या मागच्या चाकाखाली आल्याने तिच्या चेहऱ्यावरून चाक गेले. त्यामुळे विभूतीचा जागेवरच मृत्यू झाला. डंपर चालक याला सांगवी पोलीस चौकीत नेले आहे. डंपर देखील चौकीत नेला आहे.

घटनास्थळी सांगवी पोलीस दाखल होते. यावेळी येथील काही काळ रस्ता वाहतुकिसाठी बंद करण्यात आला. यावेळी स्थानिक नगरसेवक शशिकांत कदम हे त्याठिकाणी उपस्थित होते त्यानीं तातडीने संपर्क करून मुलीचा मृतदेह यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पोहचविण्यात मदत केली. तसेच या प्रकरणी सांगवी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मुळीग, उप पोलीस निरीक्षक गोविंद चव्हाण अधिक तपास करीत आहेत, घटनास्थळी पोलिसांनी माहिती दिली.
close