shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एसटीला आता आंतरराज्य प्रवासी वाहतुकीला मिळाली परवानगी...; साईभक्त व प्रवासीवर्गामधून व्यक्त होत आहे समाधान..!!

सावळीविहीर( प्रतिनिधी) :
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना आंतरराज्य प्रवासी वाहतुकीला दिनांक 20 ऑगस्ट 20 20 पासून परवानगी दिली असून आता जिल्ह्याबाहेर बसेस प्रवाशांची वाहतूक करू शकणार असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. त्यामुळे प्रवासी वर्गातून मोठे समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 देशात, राज्यात, कोरोनामुळे मोठा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन गर्दी टाळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने 22 मार्च 20 20 पासून लॉकडाऊन सुरू केला होता. त्यामुळे एसटी महामंडळानेही बसेस बंद ठेवल्या होत्या.दि. 22/ 5/ 20 20 पासून जिल्हा अंतर्गत बस प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र बाहेरील जिल्ह्यातील प्रवाशांना प्रवास करणे त्यामुळे मोठे अवघड झाले होते. ज्यांच्याकडे मोटर सायकल, कार ,आदी प्रवासी वाहने आहेत ते प्रवास करत होते. मात्र ज्यांच्याकडे अशी वाहने नाहीत .त्यांना परजिल्ह्यात प्रवास करणे मुश्कील झाले होते. त्यामुळे अशा  प्रवाशांची ही मागणी होती.या लॉकडाउन काळात एसटी महामंडळालाही सुमारे 22 ते 23 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे समजते .या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र राज्य शासनाने एसटी महामंडळाला आज दिनांक 20 ऑगस्ट 20 20 पासून आंतरराज्य प्रवासी वाहतुकीला परवानगी दिली आहे. ही प्रवासी वाहतूक टप्प्याटप्प्याने हळूहळू पूर्ववत होण्याची शक्यता आहे. या वाहतुकीमुळे एसटी महामंडळाचा तोटाही हळूहळू भरून निघण्याची शक्यता आहे. 

या आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीला शासनाने परवानगी दिल्यामुळे आता परजिल्ह्यातही प्रवाशांची बस ने-आण करू शकते. मात्र बसमध्ये निम्मेच प्रवासी प्रवास करु शकणार आहेत  .या निर्णयामुळे परजिल्ह्यात जाण्यासाठी प्रवाशांना आता सोयीचे झाले आहे .सोशल डिस्टंन्स व शासनाचे नियम पाळून ही वाहतूक सुरू होणार आहे. त्यामुळे अशा प्रवाशांमधून मोठे समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिर्डी मधूनही आता परजिल्ह्यात बसेस सुरू होतील. अशी आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे साईभक्त, प्रवासी ,शिर्डी करांमधून समाधान आनंद व्यक्त होत आहे.
close