shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अदृश्य दृष्ट वैचारिक लोकापासून नेहमी सावध रहा - डॉक्टर आसबे

इंदापूर / प्रतिनिधी तात्याराम पवार:
रक्षाबंधनानिमित्त भाऊ बहिणी ना शुभेच्छा देऊन आजचा हा विशेष लेख आपल्यासमोर मांडला  तो असा आहे की, आपली कोणतीही चुक नसताना आणि आपला कोणताही दोष नसताना, आपल्याला विनाकारण त्रास देणारा माणूस आपल्यावर जळत असतो. या कृतीपासून नेहमी सावध असायला हवे , हा माणूस दुर्लक्ष करण्या सारखा नसतो. एखाद्याच्या विकृत आणि विपरीत विध्वंसक शक्तीचा आपल्याला नेमका अंदाज नसतो कारण आपल्याला त्याचा अनुभव नसतो .



त्याच्यामुळे ज्यावेळी आपले नुकसान होते त्यावेळी ते नुकसान सोसूनच आपल्याला त्याची ही मोजता येते .
आपण बेसावध असलो तर याचा खूप त्रास होतो .आणि  सावध असलो तर मानसिक तयारीमुळे त्यावर सहजासहजी मात करतो.माणसाच्या जीवनात शत्रूपेक्षाही जळणाऱ्या व्यक्तीचा धोका जास्त असतो_ कारण शत्रू समोरून वार करतो तर जळणारा कायम मागून वार करतो आणि समोरच्या वारापेक्षा मागचा वार जास्त घातक असतो .आपल्यावर एकही माणूस जळत नाही , असा माणूस जगात शोधून सापडणार नाही . आपले यश जळणारांच्या संखेवर मोजता येते, ही संख्या जेवढी जास्त तेवढे आपले यश मोठे. त्यामुळे सर्वात जास्त यशस्वी माणसाच्या जीवनात सर्वात जास्त धोका या लोकांपासूनच असतो.जळणारी माणसे ही नेहमी जवळची असतात , त्यामुळे आपल्या कमजोरी त्यांना माहित असतात आणि .ही जळणारी जात नेहमी कमजोरीच्या शोधातच असते . जीवन मिळविणे सोपे आहे पण सांभाळणे खूप अवघडआहे , ते या लोकांमुळे.या सगळ्या प्रकारात सावधानता आणि सुरक्षितता सर्वातमहत्त्वाची आहे. मिळविण्यासाठी जीवाचे रान करणारी माणसे कदाचित याबाबतीत गाफील राहण्याची शक्यता जास्त असते .

बेसावध आणि असुरक्षित असलेली कोणतीही व्यक्ती सहज कोणाचीही शिकार होते . आपली शिकार करण्यासाठी  अनेकजण टपलेले आहेत ,

हे पावलोपावली ज्याच्या स्मरणात आहे,  तोच खरा सावध आणि सुरक्षित आहे. आजचा हा विशेष लेख बावडा येथील डॉक्टर लक्ष्मण आसबे यांनी मांडला त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक परिसरात लोकांकडून होत असल्याचे दिसले
close