shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आईच्या निधनाने दुखावला गेल्याने २५ वर्षीय मुलाने गळफास घेत संपविली जिवनयात्रा..!!

हिंगोली । प्रतिनीधी (विश्वनाथ देशमुख) ➤
दि.११, हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील पानकनेरगांव येथील २५ वर्षीय युवकाने आईच्या निधनाचे दुख: सहन न झाल्याने दि.११ आँगस्ट मंगळवार रोजी सायंकाळी पाच च्या सुमारास एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.



अधिक माहिती अशी की,सेनगांव तालुक्यातील पानकनेरगांव येथील वंदना दत्तराव काळे या महिलेने दि.०९ आँगस्ट रविवार रोजी कोणत्या तरी कारणावरून बिषारी औषध प्राशन केले होते हि बाब नातेवाईकांच्या लक्षात येताच ताबडतोब त्या महिलेला पुढील उपचारासाठी वाशिम येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारा दरम्यान त्या महिलेची प्राणज्योत मालवली.



आईच्या मृत्युने दुखावला गेलेला २५ वर्षीय मुलगा विष्णु उर्फ भोलेनाथ काळे याने दि.११ आँगस्ट मंगळवार रोजी सायंकाळी पाच च्या सुमारास वाशिम येथे एका रस्त्याच्या कडेला लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने काळे कुटुंब चांगलेच हादरुन गेले आहे. आई पाठोपाठ मुलाने ही जिवनयात्रा संपविल्याने गावात एकच शोककळा पसरली आहे.याप्रकरणी वाशिम पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
close