अंबरनाथ । प्रतिनिधी (जाफर वणू) ➤
डिजिकेम इंडस्ट्रीज कंपनीत मे. सचिन इंटरप्रायझेसच्या कामगारांनी कोरोना संकटकाळात आपल्या जीवाची पर्वा न करता काम केल्याबद्दल कंपनीचे डायरेक्टर सचिन पोरे, मे. सचिन इंटरप्रायझेस मालक सदाशिव पाटील व सचिन पाटिल ह्यांच्यावतीने या कामगारांना रोख बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
अंबरनाथ पूर्वेकडिल आनंदनगर एमआयडीसीमध्ये डिजिकेम इंडस्ट्रीज या नावाची कंपनी असून या कंपनीत मे. सचिन इंटरप्रायझेस ह्यांचे लेबर सप्लाय असून याठिकाणी सुमारे 100 कामगार काम करतात. तसेच कोरोना सारख्या महामारीच्या संकटात सरकारकडून लॉकडाउन घोषित करण्यात आले होते. या लॉकडाऊन दरम्यान मे. सचिन इंटरप्रायझेसच्या कामगारांनी आपल्या जीवाची पर्वा न करता तसेच कुठल्याही प्रकारची बाधा न आणता आपलं मन मोठे करून कंपनीच्या कामात सहकार्य केले. याकरिता त्यांना मोबदला मिळावा म्हणून मे. सचिन इंटरप्रायझेसचे मालक सदाशिव पाटील व सचिन पाटील यांनी डिजिकेम इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापनाकडे विनंती करण्यात आली. या विनंतीला मान ठेऊन कंपनीच्या व्यवस्थापनाने दि. 10 ऑगस्ट 2020 रोजी प्रत्येकी कामगारांना सुमारे 6 ते 7 हजार रुपये बक्षीस स्वरूपात देण्यात आले व घरगुती किचनच्या सामानाकरिता हि आर्थिक मदत करण्यात आली. सदर वेळेस कामगारांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
याप्रसंगी डिजिकेम इंडस्ट्रीज डायरेक्टर सचिन पोरे, मे. सचिन इंटरप्रायझेसचे मालक सदाशिव पाटील, सचिन पाटील, डिजिकेम इंडस्ट्रीजचे मॅनेजर संजय झेमसे, भरत गंगोत्री, संतोष भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.