shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मोबाईल डीपी वरून पोलिसांनी लावला खुनाचा छडा... अवघ्या बारा तासात पोलिसांकडून खेड तालुक्यातील शिरोली येथील दुहेरी खून प्रकरणातील आरोपींना अटक...

विद्याधर साळवे  ( राजगुरुनगर प्रतिनिधी )दि.१०-०८-२०२०.
खेड तालुक्यातील शिरोली येथील हरणटेकडी वर शनिवारी दोन युवकांचे हत्यारांनी छिन्नविच्छिन्न केलेले मृतदेह आढळून आले होते.या मृतदेहांची ओळख पटविणे ही पोलिसांना अवघड झाले होते परंतु पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीने मृतदेहांची ओळख आपले मित्र म्हणून सांगितली त्यावरून मृतदेहांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून राजगुरुनगर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.


मृतदेह सापडलेल्या शिरोली गावातील एका युवकाच्या मोबाईल डीपीवर रात्री बारा वाजता डब्ल्यू पी 302 अशी डीपी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तपासाचा केवळ हा धागा पकडून खेड उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली राजगुरुनगर पोलिसांनी बबलू उर्फ अभिषेक उत्तम भालेराव वय 19 वर्ष ऋषिकेश राजेंद्र वाडेकर वय 22 वर्ष निखील अशोक शिंदे वय 20 वर्ष सर्व राहणार वाडेकर वस्ती शिरोली यांना अटक केली आहे.

पिंपरी-चिंचवड व परिसरात अजून काही आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.
पिंपरी चिंचवड येथे काही दिवसांपूर्वी एका युवकाचा खून झाला होता या घटनेत सहभागी असल्याच्या संशयावरून निरंजन अशोक गुरव वय 20 वर्ष राहणार पिंपळे गुरव आणि बजरंग दयानंद जाधव वय 22 वर्ष राहणार वैद्य वस्ती पिंपळे गुरव ( मूळ राहणार गठ्ठे राय पाळी तालुका बसवकल्याण जिल्हा बिदर कर्नाटक )अशी शिरोली येथे खून झालेल्या दोन युवकांची नावे आहेत
         
करोना सारख्या महामारी च्या पार्श्वभूमीवर अवघ्या बारा तासात शिरोली येथील दुहेरी खून प्रकरणातील आरोपींना जेरबंद केल्यामुळे सर्वत्र राजगुरुनगर पोलिसांचे कामाचे कौतुक होत आहे
----------------------------
close