shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विडा येथे बाप लेकाच्या भांडणात मुलाचा मृत्यू..... !!

विडा येथे बाप लेकाच्या भांडणात मुलाचा मृत्यू.....  !! 

केज  ।  प्रतिनिधी   ( प्रकाश मुंडे)  :- 

केज तालुक्यातील विडा या गावी क्षुल्लक कारणावरून झालेल्या बाप लेकाच्या भांडणात मुलाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
 
    या विषयी सविस्तर माहिती अशी की केज तालुक्यातील विडा येथील भागवत आश्रुबा जाधव व त्यांचा मुलगा अण्णा भागवत  जाधव वय 23  यांच्यात दारू पिण्याच्या कारणावरून वारंवार तक्रारी होत असत. मात्र शुक्रवारी ४.३० च्या दरम्यान दोघांचे भांडण टोकाला गेले अन दोघात दगडाने एकमेकांवर प्रहार करत हाणामारी झाली. यामध्ये अण्णा जाधवच्या डोक्यात दगड लागल्याने गंभीर जखमी झाल्याचे पाहून बाप पळून गेला. मात्र गावातील कांही लोक अण्णा यास एका गाडीत दवाखान्यात घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. बाप मात्र रक्ताने माखलेल्या अवस्थेत पळून गेल्याचे समजते. केज पोलीस ठाण्याचे एपीआय श्री. मिसळे, बिट अंमलदार श्री.मुंडे घटनास्थळी रवाना झाले व बापाला ताब्यात घेण्यात आले आहे.असल्याची माहिती पोनि प्रदीप त्रिभुवन यांनी दिली.
close