मुंबई, दि. 5 : माजी मंत्री व शिवसेनेचे उपनेते अनिल भैया राठोड यांच्या निधनामुळे सर्वसामान्यांसाठी कायम झटणारा नेता आपण गमावला आहे, अशा शब्दांत वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
सामाजिक व राजकीय जीवनात काम करताना अनिल भैया राठोड यांचे शेवटपर्यंत मार्गदर्शन मिळत राहिले. गेल्या आठ दिवसांपूर्वीच त्यांचे व माझे बोलणे झाले होते असे सांगून मंत्री संजय राठोड पुढे म्हणाले, अनिल भैया म्हणजे तळागाळापर्यंत काम करणारे शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते होते. सर्वसामान्य माणसाला ते सहजपणे उपलब्ध होत असत. त्यांच्या घरी लोकांची नेहमी गर्दी असे. प्रत्येकाच्या सुखदुःखात ते नेहमी सहभागी व्हायचे. त्यांच्या निधनामुळे आपले व्यक्तिगत मोठे नुकसान झाले असून अन्यायाच्या विरोधात लढणारा नेता आपण गमावला आहे.
00000

