shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दिग्दर्शक कैलाश मेधाणे कृत "कळले नाते खरे" 16 सप्टेंबर ला रिलीज..!!


 दिग्दर्शक कैलाश मेधाणे कृत
"कळले नाते खरे"  हे गीत झी मुझीक कंपनीला रिलीज होत आहे. यामध्ये मुख्य भुमिकेत निकिता पिंगळ व किशोर शिंदे हे आहेत. या गाण्याचे लेखन, गायन व संगीत वसंत हंडीबाग यांनी केले आहे. तसेच या गाण्याचे
निर्माते:  वंसत हंडीबाग 
सिनेमेटोग्राफर : विनायक जंगम 
मेकपआर्टिष्ट :  संदीप रायकर 
आर्ट दिग्दर्शक :  गजानन तांबे
पोस्ट प्रोडक्शन : द ऑसम स्टुडीओ
प्रोडक्शन टीम : रितीक कोस्टी, आदित्य जंगम यांनी सांभाळले आहे.  


या गाण्याचे दिग्दर्शक कैलाश मेधाणे यांनी आत्तापर्यंत चित्रपट सृष्टित अनेक मराठी, हिंदी सुपहीट गीत केले आहेत. कोरोनाच्या काळात त्यांचे सर्वात सुपरहीट झालेले गीत "जा लढवाया तु मावळ्या" हे गीत अख्या महाराष्ट्रात सुपरहीट झाले होते. हे गीत T Series या कंपनीने रिलीज केले होते. तसेच हे गीत अनेक न्युज चॅनेल नी आपल्या माध्यमातून दाखवले होते. तसेच अनेक न्युज पेपर मधुन या गीता बद्दल च्या बातम्या छापून आले होते. संपूर्ण महाराष्ट्रात या गीताचे कौतुक केले जात होते. 

तसेच त्यांचे "फक्त तु" हे गीत सुध्दा झी म्युझीक कंपनीने रिलिज केले आहे. (पंढरीच्या दारी गर्जला मृंदुंग, गण गण गणात बोते, बाप्पा मोरया रे, महादेव पार्वतिचा गणपती, गणनायक सिद्धी विनायक ) असे अनेक गीत सुमीत म्युझीक,  कुनाल म्युझीक या कंपन्यांनी रिलीज केले आहेत. 9X झकास, संगीत मराठी, मायबोली या सारख्या अनेक TV चॅनेलला सुपहीट झाले आहेत.

दिग्दर्शक कैलाश मेधाणे हे मुळचे नाशिक चे त्यांना लहान पणापासुन फिल्म लाईन ची आवड होती. त्यांना अभिनेता व्हायचे होते. पण घरची परिस्थिती बेताची असल्या मुळे त्यांना  ते शक्य नव्हते. त्यांना आपले शिक्षण पुर्ण करून महींद्रा अँन्ड महींद्रा कंपनी नाशिक मधे जॉब लागला. त्यानंतर पण त्यांनी तो सोडून दिला, व त्यानंतर त्यांनी स्व:ताचे फॅब्रीकेशन वर्कशॉप टाकले. त्यांनी तेही सोडले त्यानंतर त्यांनी घरी आई वडीलांसोबत शेती केली. पण त्यांना यात काही मन रमत नव्हते. 

खरे तर त्यांना अभिनेता व्हायचे होते.म्हणुन अखेर त्यांनी नाशिक सोडुन मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. घरची परीस्थीती बेताची असल्या मुळे पुरेसे पैसेही जवळ नव्हते. जिकडे मिळेल तिकडे ते ऑडिशन देत फिरत होते. हळू हळू मिळेल ते काम करत फिल्म लाईन मध्ये काही नवीन मिञांच्या मदतीने काम मिळायला लागले त्यात. मराठी मालिका , हिन्दी मालिका , चित्रपट मध्ये काम मिळायला लागले. पण कधी काम मिळायचे तर कधी नाही. घरची परीस्थिती बेताची असल्यामुळे घरूनही पैसे मागु शकत नव्हते. त्यामुळे आता करायचे तरी काय हा मोठा प्रश्न होता. त्यातच त्यांनी दिग्दर्शक होण्याचा निर्णय घेतला मग सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांना काम मिळु लागले. मग असिस्टंट चे काम करत ते एक चांगले मराठी चिञपट सृष्टितले चांगले दिग्दर्शक म्हणून नावारुपाला आले. 

खरे तर घरची परिस्थिती बेताची असतानाही इतके मोठे स्वप्न बघणं आणि ते यशस्वी करून दाखवणे हे त्यांच्या कडुन शिकावे. कैलाश मेधाणे हे एक खुप हुशार मनमिळाऊ असे व्यक्तिमत्व आहेत. लवकरच त्यांचे आपल्याला मराठी चिञपट सुध्दा बघायला मिळतील.काही चिञपटांवर लवकरच त्यांच काम चालु आहे.येणार्‍या भविष्यात कैलाश मेधाणे हे नाव एक चांगला दिग्दर्शक, चांगले व्यक्तिमत्व म्हणुन आपल्या सर्वांच्या मनात घर करुन जाईल यात काही शंकाच नाही...!!

सुजित सुरवसे
मेकअप आर्टीस्ट
close