shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोहा तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्र व 29 आरोग्य उपकेंद्राचा कारभार रामभरोसे...!!



अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने तालुक्यातील वैद्यकीय सेवेचा बोजवारा..!!

लोहा: अशोक सोनकांबळे
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्र व 29 आरोग्य उपकेंद्राच्या वैद्यकीय सेवेचा कारभार रामभरोसे असल्याचे धक्कादायक चित्र असून दस्तुरखुद्द लोहा तालुका आरोग्य अधिकारी यांच्या सह प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी नांदेडहून अपडाऊन करत असल्याचे गंभीर चित्र पहावयास मिळत असून कोरोनाच्या गंभीर संकटात  या जबाबदार वैद्यकीय अधिकार्‍यांच्या बेजबाबदारपणामुळे तालुक्यातील वैद्यकीय सेवेचा पुरता बोजवारा उडाला असल्याची गंभीर परिस्थिती तालुक्यात दिसून येत आहे. 

लोहा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत माळाकोळी, सोनखेड, पेनुर, कापशी ,कलंबर असे पाच प्राथमिक आरोग्य केंद्र अस्तित्वात असून ,तालुक्‍यातील आरोग्य उपकेंद्राची एकूण संख्या 29 आहे .ग्रामीण भागातील गोरगरिबांची जीवन वाहिनी म्हणून ओळख असलेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्रांमध्ये तालुक्यातील ग्रामीण भागातील हजारो रुग्ण दैनंदिन उपचार घेतात. कोरोनाच्या संकटात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे शासनाचे सक्त आदेश असताना सुद्धा लोहा तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या दैनंदिन अप- डाऊन'मुळे  अधिकाऱ्यचे बेजबाबदार वर्तन पहावयास मिळत आहे .

लोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातून दिवसेदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना तालुका आरोग्य अधिकारी व  तालुक्यतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांच्या बेजबाबदारपणामुळे  कोरोनाच्या संकटात तालुक्यातील वैद्यकीय सेवेला मरगळ आल्याचे धक्कादायक  चित्र पहावयास मिळत आहे.
close