इंदापूर प्रतिनिधी तात्याराम पवार
भिगवण दि.१०/०९/२०२० रोजी इंदापूर पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे यांनी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी तहसीलदार इंदापूर गट विकास अधिकारी इंदापूर यांना त्यांच्या पत्राद्वारे मागणी करून कळविण्यात आले आहे
भिगवण कोवीड मध्ये सध्या असलेल्या सर्व बेड रुग्णांनी पूर्ण झाले आहेत भिगवण दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह नागरिकांची संख्या वाढत असून याठिकाणी बऱ्याच पेशंटला ऑक्सिजनची गरज भासत आहे व काही रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज भासत आहे तरी भिगवण व भिगवण परिसरातील लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी आपण लवकरात लवकर ऑक्सीजन बेड व्हेंटिलेटर बेडची सोय करावी तसेच भिगवण कोवीड सेंटरला आजची परस्थिती पाहता जेवढे बेड उपलब्ध आहेत तेवढे फुल आहेत त्यामुळे नवीन रुग्ण आल्यास त्याला इंदापूर व निमगाव आणि जर व्हेंटिलेटर ची गरज पडली तर खासगी हॉस्पिटलमध्ये पाठवावे लागत आहे परंतु सेंटरला रुग्णवाहिकेची सोय नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत तातडीने रुग्णाला रुग्णवाहिकेची आवश्यकता लागल्यास ती इंदापूर व निमगाव येथून मागवावी लागते त्यामुळे भिगवण सेंटरला रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी तसेच इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत व पोलीस कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर तालुक्यातील नागरिकांवर मास्क न घातल्याने केलेल्या कारवाईतून जो दंड वसूल होत आहे तो दंड ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन कोवीड सेंटरच्या खर्चासाठी उपयोगात आणाव्यात भिगवण कोवीड सेंटरमध्ये अजूनही बेडची संख्या वाढवून रॅपिड टेस्ट ची सुरुवात करावी त्यामुळे भिगवण व परिसरातील नागरिकांची बारामती तसेच इंदापूर ला जायची गरज पडणार नाही लवकरात लवकर रिपोर्ट मिळेल व रुग्णांना त्वरित उपचार मिळेल अशी व्यवस्था तातडीने करण्यात यावी अशी माहिती उपसभापती संजय देहाडे यांनी दिली यावेळी माजी सरपंच तक्रारवाडी चे गणेश वायदंडे प्रतापभाऊ भोसले सुधीर भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते

