जळगाव जिल्हा प्रतनिधी, प्रमोद चौधरी
एरंडोल - सेवा संघाच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त एरंडोल येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात समाजाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक शिवाजीराव अहिरराव यांचे
अध्यक्षतेखाली फिजिकल डिस्टन्स चे सर्व नियम पाळून वैचारिक कार्यक्रम तसेच राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष जाधवराव भीमसेन जगताप,एरंडोल तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष तथा शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे पदाधिकारी किशोर पाटील कुं झरकर, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे राकेश पाटील, विनायक राव कुलकर्णी उमेश मुराळकर या मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी प्रास्ताविकातून मनोगत व्यक्त करताना मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील कुंझ रकर यांनी मराठा सेवा संघाचे संस्थापक युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघाच्या स्थापना करण्यामागील वैचारिक अधिष्ठान आणि मराठा सेवा संघाच्या वैभवशाली आज पर्यंतच्या वाटचालीवर प्रकाशझोत टाकला. आणि मराठा सेवा संघाचे सर्व कक्षांची माहिती देत तरुणांनी व समाजातील सर्व घटकांनी या विचार प्रवाहात सामील होण्याचे आवाहन किशोर पाटील कुंझरकर यांनी केले.शेवटी राकेश पाटील यांनी आभार व्यक्त केले

