shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सावळीविहीर बु।। गावामध्ये आता संशयास्पद हालचाली व व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेरात होणार कैद..!!


सावळीविहीर (प्रतिनिधी) :
राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक गाव आता सीसीटीव्ही कॅमेरांच्या नजरकैदेत येणार असुन त्यामुळे येथे रात्री होणाऱ्या भुरट्या चोऱ्या व गुन्हेगारीला नक्कीच आळा बसणार आहे .त्यामुळे सावळविहीरकरांमधून समाधान व्यक्त होत आहे.


सावळीविहीर बुद्रुक हे एक  मोठे गाव असुन आसपासच्या सात आठ गावांचे हे बाजारहाटाचे केंद्र आहे.या गावामध्ये येथील ग्रामपंचायतीच्या वतीने नागरी विकास योजनेअंतर्गत, गावामध्ये भुरट्या चोर्‍यांचे प्रमाण वाढल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे वेगवेगळ्या ठिकाणी, महत्त्वाच्या चौकात बसविण्यात आले आहेत. 

सावळीविहीर बुद्रुक ग्रामपंचायतीने नवीन इमारत बांधली आहे. या इमारती शेजारीच कामगार तलाठी यांचे कार्यालयाचीही इमारत नवीन झालेली आहे. या दोन्ही नुतन  इमारतीसमोर नुकतेच प्लेविंगबॉक्स बसवण्यात आले आहेत.त्यामुळे  नवीन ग्रामपंचायत व कामगार तलाठी कार्यालयासमोरचा हा परिसर अगदी सुशोभित झाला आहे.पाईपचे कंपाऊंड करण्यात आले आहे.तसेच सावळीविहीर गावांमध्ये  सिमेंटचे पाईप टाकून गावातील गटारी ह्या अंडरग्राउंड करण्यात आल्या आहेत.त्यामुळे उघड्या गटारांमुळे होणारे डास व साथीचे आजार याला पायबंद बसणार आहे.

त्याचप्रमाणे येथे महत्त्वाचे म्हणजे भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते.त्यामुळे सावळीविहीर बुद्रुक ग्रामपंचायतीने येथील मारुती मंदिरा समोर सीसीटीव्ही कॅमेरा बसला असून त्यामुळे रस्त्यावरचे सर्व जाणारे येणारे या कॅमेऱ्याच्या नजरकैदेत  राहणार आहे. त्याचप्रमाणे मंदिराच्या पाठीमागे कॅमेरा बसवल्यामुळे जुन्या ग्रामपंचायती समोरील संपूर्ण परिसर कॅमेरात कैद होणार आहे. एवढेच नव्हे तर बाजारतळ तसेच नूतन ग्रामपंचायती समोर,व न्यू इंग्लिश स्कूल रस्त्याकडे,शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ ,त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ असे वेगवेगळे सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात आले आहेत. तसेच  ग्रामपंचायत कार्यालयाच्यामागे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून या शाळा इमारती समोरही  विविध  बाजूने सीसीटीव्ही कॅमेरे  या शाळेने पूर्वीच लावलेले आहेत. त्यामुळे आता या 

परिसरातील हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होणार आहेत. एवढेच नव्हे तर या सर्व सीसीटीव्ही कॅमेरात होणाऱ्या हालचाली , चित्र किंवा एखादी संशयास्पद व्यक्ती या सर्वांचे चित्रीकरण होत असते.हे सर्व चित्रीकरण किंवा फुटेज येथिल सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या मोबाईलवर दिसणार आहे. तशी यंत्रणाही कनेक्ट करण्यात आली आहे.त्यामुळे जर एखादी संशयित व्यक्ती येथे रात्री फिरत असल्यास ताबडतोब पोलीस स्टेशनला संपर्क करून या  व्यक्तीचा शोध घेता येईल. अशी नव्याने यंत्रणा येथे  कार्यरत करण्यात आली आहे.त्यामुळे सावळीविहीर गावांमध्ये यापुढे सर्वजण,येणारे-जाणारे ,तसेच संशयित कोणीही असो ,हे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद होणार आहे, अशी माहिती सरपंच रूपाली संतोष आगलावे, उपसरपंच वृषाली ओमेश जपे व ग्रामविकास अधिकारी रावसाहेब खर्डे यांनी दिली आहे. त्यामुळे  गावांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ग्रामपंचायतीने उचलले असल्याचे नागरिकांमधून बोलले जात असून येथील ग्रामस्थ मार्फत या सीसीटीव्ही कॅमेरे बसवले बद्दल समाधान व्यक्त होत आहे.
close