Pune:-पुणे छावणी परिसरात गोळीबार मैदानाजवळ असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून एसीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आग लागली असावी अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

