shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

*कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदल्यांचे आदेश; पोलिसांचा आरोप..!!


पुणे:-कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच आलेल्या बदली आदेशाविरोधात संतप्त 100 पोलीस कर्मचारी पुणे आयुक्त कार्यालयात दाखल झाले आहेत. जारी करण्यात आलेला बदली आदेश मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदल्यांचे आदेश देण्यात आल्याचा आरोप पोलिस अधिका-यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे पोलीस कर्मचारी नवनियुक्त पोलीस आयुक्त अभिनव गुप्ता यांना भेटून बदली आदेश मागे घेण्याची विनंती करणार आहेत.

एकूण 1289 पोलीस कर्मचाऱ्यांचे बदली आदेश आले असल्याची माहिती आहे. यातील शंभर पोलीस पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात आले. त्यांनी ही बदली रद्द करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, या संदर्भात पोलीस आयुक्त नेमका कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
close