पाटण । प्रतिनिधी :
मस्करवाडी (पाटण) येथील माजी सरपंच राजकारणातील महामेरु अशी ओळख असणारे ज्यांना सलग चार वेळा सरपंच म्हणुन जनतेने निवडुन दिले.
तसेच त्यांनी उत्कृष्ट निर्मल ग्रामपंचायत म्हणुन पुरस्कार मिळवुन दिला असे माजी सरपंच बाळु हरी मस्कर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे त्यांची बायको दोन मुले, दोन सुना आणि दोन मुली असा परिवार आहे.

