shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कांताबाई यांना अनोखी आदरांजली...!मानियार बिरादरी च्या प्रयत्नाने अनागथ वधूला मिळाला नाथ..!!

प्रतिनिधी  । नूरुद्दीन मुल्लाजी
जळगांव : नवापूर येथील तरुणी तय्यबा  बी चे वडीलाचे छत्र १० व्या वर्षी हरपले आई आता लॉक डाऊन मध्ये सोडून गेली घरी कोणीच नाही त्यात ती तरुण म्हणून एकटी नवापूर ला न ठेवता  मावसा हमीद शेख ने जलगाव येथे मानियार वाड्यात घेऊन आले व तेव्हा पासून या अनाथ वधू साठी नाथ शोधायचा काम बिरादारीने सुरू केलं. धुळे येथील जब्बार खान यांना साकडे घातले असता त्यांनी आपल्या मोहसीन साठी तय्यबा  ला होकार दिला अशा प्रकारे अनाथ वधू ला नाथ मिळाला.

*कांताई च्या स्मृती दिनी केले विवाह*
 विवाह कसा व केव्हा करावा असा प्रश्न धुळे येथील मंडळी ने करताच आज ६ सप्टेंबर हा आमच्या जळगाव येथील प्रख्यात उद्योगपती डॉ भवरलाल जैन यांच्या अर्धांगिनी कांता बाई जैन यांचा १५ वा स्मृती दिन असून त्या अत्यंत साध्या व नाती जपणाऱ्या गृहिणी होत्या म्हणून आजच तो विवाह करण्यास हरकत नाही असा प्रस्ताव प्रदेशअध्यक्ष फारूक शेख यांनी जिल्हा उपाध्यक्ष सैयद चाँद, बिरदारीचे वरिष्ठ व वधूचे पालक सैयद हमीद,वराचे वडील जब्बार खान यांच्या समोर सादर करताच घरातील महिलांशी चर्चा करून लागलीच सर्वांची संमती मिळताच शेजारी असलेल्या जामा मस्जिद मध्ये हा निकाह लावण्यात आला.

मौलाना उस्मान कासमी यांनी निकाह लावला,वधू तर्फे वकील म्हणून सैयद रहेमतुल्लाह अमीर,रा मेहरुण जळगांव, तर वरा तर्फे साक्षीदार म्हणून सैयद मुश्ताक मुसा व अमजद खा जब्बार खा दोघे राहणार धुळे यांनी कामगिरी पार पाडली

विवाह यशस्वी ते साठी अनवर खा जब्बार खा,इम्रान खान, (धुळे)मौलाना सैयद मुस्तफा( नवापूर) सैयद युनूस,सैयद हमीद, सैयद चाँद, अब्दुल रऊफ,सलीम मोहम्मद,सादिक मुसा,साबीर सैयद,(सर्व जळगाव) यांनी प्रयत्न केले.
close