shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरी येथे एक एकर उसाला आग... शेतकरी भागवत काटकर यांची पंचनामा व्हावी म्हणून मागणी..!!

इंदापूर प्रतिनिधी तात्याराम पवार
दिनांक ३/९/२०२० रोजी वडापुरी नजीक काटकर वस्ती येथील शेतकरी भागवत काटकर यांच्या शेतामधील एक एकर ऊस जळाला आहे.



भागवत काटकर यांचा 265 या जातीचा पंचवीस ते तीस कांड्यावर असणारा उस आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याने उभ्या पिकाचे व शेजारील झाडांचेही नुकसान झाले आहे अतिशय कष्टातून व कमी पाण्यावरती जोपासलेला ऊस जळालेला असल्याने त्यांनी सदर उसाचे पंचनामा झाला पाहिजे . तसेच संबंधित अधिकारी यांना कळवल्याचे ही त्यांनी प्रत्यक्ष सांगितले यावेळी गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अंबिका बागल तसेच श्री शत्रुघ्न बागल समीर मदने सुनील पवार दीपक जगदाळे सचिन माने गोपाळ माने हरिदास काटकर किरण पवार वासुदेव थोरात इत्यादी ग्रामस्थ सदर ठिकाणी उपस्थित होते
close