गडचिरोली ता.३ :- जिल्हयात आज १५ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये गडचिरोली येथील २, चमोर्शी येथील ७, सिरोंचा ६ असे एकूण १५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
तर १८ नवीन कोरोना बाधितांमध्ये सिरोंचा ३, गडचिरोली ४, चामोर्शी ३, धनोरा येथील २ यामधे १ पोलिस व १ सिआरपीएफ जवान, वडसा ३ यामधे आरोग्य कर्मचारी एक तसेच इतर रुग्णाच्या संपर्कातील दोघे, आरमोरी तालुक्यातील २ व कुरखेडा १ असे आज एकूण १८ कोरोना बाधित आढळून आले.
यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या ३०४ झाली असून एकुण बाधित संख्या १२१४ झाली आहे. आत्तापर्यंत एकूण ९०९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

