गडचिरोली ता.3 :- गडचिरोली उपविभांगातर्ग येणाऱ्या पोटेगाव पोलिस मदत केंद्राच्या हद्दीत नागवेली येथील सखाराम झगडू नरोटे(३३) या समर्थकांचा पैशाच्या वादातून नक्षलवाद्यांनी गोळी झाडून हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार सखाराम नरोटे हा २०१५ पासून नक्षल समर्थक म्हणून पोलिस दप्तरी नोंद असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तो नक्षलवाद्यांना मदत करीत होता. दरम्यान १ सप्टेंबरच्या रात्री २० ते २५ नक्षलवादी सखारामच्या घरी गेले. त्यांनी सखाराम आणि त्यांचा भाऊ श्यामराव नरोटे यांना जंगलात नेऊन मारहाण केली.
त्यानंतर शामरावला गावात सोडून दिले तर येडमपायली ते हलामीटोला रस्त्याच्या बांधकाम कंत्राटदाराकडून पैसे वसूल करूनही ते नक्षल दलमला दिले नाही. या कारणावरून नक्षल्यांनी त्याच्यावर गोळी झाडून हत्या केली. अशी माहिती पोलिसांनी दिली.

