- एसबीआय बँक मँनेजर कडून शेतकऱ्यांना अरेरावीची भाषा, पिककर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे..
हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.०४,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव येथील स्टेट बँक ऑफ इंडिया कडून पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक होत शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगाव तहसीलवर धडक मोर्चा काढण्यात आला व तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले सेनगाव येथील स्टेट बैंक ऑफ इंडिया मधे पिककर्ज वाटप संदर्भात अनेक अडचणी येत आहे बँक मँनेजर अरेरावची भाषा वापरत आहेत आणि शेतकऱ्यांचे कोणतेही काम करायला तयार नाहीत यामुळे गेल्या चार महिन्या पासून शेतकरी बैंकेच्या चकरा मारत आहेत याकडे प्रशासनाकडून साफ दुर्लक्ष होत आहे प्रशासनाच्या मोठ्या कर्ज माफी नंतर देखील सेनगाव येथील बँक कर्ज देण्यात टाळाटाळ का करीत आहे या साठी सेनगाव तहसील कार्यालयावर दि.०३ सप्टेंबर गुरुवार रोजी धडक मोर्चा काढून तहसीलदार जीवकुमार कांबळे यांच्या कडे निवेदन सादर करण्यात आले आहे.
लवकरच हा कारभार सुरळीत झाला नाही तर बँक अधिका-यांना सरळ करुन शेतकर्यांना कसा न्याय मिळवून द्यायचा हे "संदेश देशमुख"ला चांगल्या प्रकारे माहीती आहे.ती वेळ येऊ देऊ नका असा इशारा देखील उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी दिला. यावेळी हिंगोली शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख,सचिन हराळ,बबन जाधव,केशव चव्हाण,अशोक राठोड,सुनील ईरतकर यांच्यासह शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

