shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संभाजी बिडी विरोधात शिवधर्म फाउंडेशनचा राज्य व्यापी साखळी आंदोलनाचा इशारा..!!

इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार) राज्यातील शंभर हून अधिक संघटनांचा जाहीर पाठिंबा.बीडीवरील नाव न बदलल्यास त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटण्याची शक्यता.



पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांना निवेदन देताना अध्यक्ष दिपक काटे व शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते.


महाराष्ट्रात  गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने  धुमप्रपान करण्याचे साधन असलेल्या विडी चा  व्यवसाय सुरू आहे.याच्या विरोधात शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्या चे संस्थापक अध्यक्ष दिपक आण्णा काटे , मच्छिंद्र टिंगरे, सुनील पालवे,  सागर पोमण , दिनेश ढगे व रवी पडवळ इत्यादींनी दि. ४-९-२०२० पासुन पुरंदरच्या पायथ्याशी आमरण उपोषणाला बसले होते.


त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले साबळे वाघिरे आणि कंपनी महाराष्ट्रात गेले ८३ वर्ष छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने तंबाखू जन्य पदार्थ असणार्या विडी विकण्याचा व्यवसाय करत आहेत.सन १९३२ साली त्यांनी विडीला अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देऊन आपला व्यवसाय सुरू केला.परंतु १९६५ साली एका सामाजिक संघटनेने यांच्या विरोधात आवाज उठवला आंदोलने केली.तरीही त्यांने त्याची दखल घेतली नाही.जेव्हा त्यांनी हायकोर्टात जाण्याचा पर्याय निवडला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव THE EMBLEMS AND NAMES PREPENTATION OF IMPROVER USE ACT 1950 या कायद्या प्रमाणे महापुरुषांच्या यादीत नाव समाविष्ट करावे लागेल.त्यानंतर त्या कायद्या अंतर्गत शिवाजी महाराज यांचे नाव महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करुन विडी वरील नाव तात्काळ हटविण्याचे आदेश हायकोर्टाने दिले.परंतु त्या साबळे वाघिरे आणि कंपनी ने या वर पळवाट शोधून त्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव दिले.व त्यावर महाराजांचा फोटो देखील होता.नंतर काही संघटनांनी या वर आक्षेप घेतला तेव्हा त्या बंडल वरील महाराजांचा फोटो हटवला परंतु नाव तसेच ठेवले.


या वरुन आपल्या लक्षात येते की ही कंपनी गेले अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी व संभाजी महाराज यांचा जाणीवपुर्वक अवमान करत आहे.

याच्या विरोधात मी व माझे सहकारी दि.४-९-२०२० पासून पुरंदर च्या पायथ्याशी आमरण उपोषणाला बसलो होतो परंतु प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही.आमचा एक सहकारी गेले तीन दिवस जेजुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे.तरी आम्ही जिवाची पर्वा न करता उपोषणाला बसलो होतो.परंतु प्रशासनाने कोव्हीड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नोटीस काढून आम्हाला उपोषण स्थगित करायला सांगितले.व आमच्या एका सहकार्याची प्रकृती अधिकच खालावली होती.या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आम्ही उपोषणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे.

परंतु आम्ही १५ सप्टेंबर पासुन राज्यव्यापी साखळी आंदोलन सुरू करणार आहोत.त्याची रुपरेक्षा खालील प्रमाणे
१) साबळे वाघिरे आणि कंपनीच्या उत्पादनावर बहिष्कार व खरेदी विक्री बंद दि.१५ सप्टेंबर २०२०
२)२२ सप्टेंबर रोजी साबळे वाघिरे आणि कंपनी व कार्यालयावर धडक मोर्चा.
३)२९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्यभर आमदार खासदार यांना घेराव.
४)६ अक्टोंबर रोजी राज्य भर रास्ता रोको आंदोलन.

मंगळवार दि ८ रोजी पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी आंदोलन कर्त्यांनची भेट घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे तसेच आम्ही शासन स्तरावर या गोष्टीचा पाठपुरावा करु असे आश्र्वासन दिले.तसेच सासवडचे पोलीस निरीक्षक हाके साहेब यांना आपण अखंड महाराष्ट्र राज्याचे दैवत छत्रपती शिवाजीराजे भोसले व संभाजी राजे भोसले यांचा एकेरी उल्लेख व विडी बंडला नाव देऊन केलेल्या जाणीवपुर्वक अवमानामुळे कंपनी मालकांवर गुन्हा दाखल करा त्या शिवाय आम्ही उपोषण सोडणार नसल्याचे सांगितले.रात्री उशिरा पर्यंत कंपनी मालकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.अखेर गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही प्रशासनास सहकार्य करुन हे उपोषण तात्पुरते स्थगित करत आहेत असे सांगितले.
close