shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नरेंद्रजी मोदी यांचा अभिष्टचिंतन दिवस साजरा करायला मिळणे हे आमचे भाग्य ... युवा नेते अमोलराजे इंगळे..!!


इंदापूर । प्रतिनिधी: तात्याराम पवार
बाभूळगाव २१/०९/२०२० रोजी  पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बाहेरगावाहून आलेल्या ऊस तोडणी मजूर कुटुंबांना फळे वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाचे आयोजन भाजप युवा नेते सामाजिक कार्यकर्ते अमोलराजे इंगळे आणि युवा मोर्चा इंदापूर तालुका अध्यक्ष मा. श्री. राम (भाऊ) आसबे , तसेच भरत आसबे, नारायण आसबे, सोमनाथ मोरे, सागर लांडे, व अन्य युवा कार्यकर्ते सहभागी होते. यावेळी अमोल राजे इंगळे. म्हणाले की भारत देशात भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा सहयोग सप्ताह पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत आहे.

सफरचंद केळी इत्यादी फळे वाटप करत असताना युवा नेते अमोल राजे इंगळे

 
माझी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेत इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव येथे बाहेर गावाहून आलेल्या  ७० ऊस तोडणी कुटुंबांना फळ वाटप करून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या  अभिष्टचिंतन दिवस साजरा करायला मिळणे हे आमचे भाग्य आम्ही मानतो त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आम्हाला सार्थअभिमान वाटतो .यापुढे त्यांनी ठरवून दिलेल्या संकल्पनेनुसार आम्हीही आमच्या कार्यातून  देशसेवा  करून दाखवू. यावेळी  याठिकाणी मजूर व गावातील इतर मान्यवर उपस्थित होते.
close