shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःचे व कुटुंबाचे आरोग्य सांभाळावे!"- राजा रामस्वामी, पोलीस अधीक्षक..!!

पोलीस अधीक्षक राजा रामस्वामी यांची भेट..


केज । जिल्हा प्रतिनिधी : प्रकाश मुंडे:- 
नूतन पोलीस अधीक्षक राजा रामस्वामी यांनी केज पोलीस स्टेशनला आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी भेट दिली.

"सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी कोरोना विषाणू विषयी जागरूक राहून स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी "
        ----- राजा रामस्वामी, 
     जिल्हा पोलीस अधीक्षक बीड .

या बाबतची माहिती अशी की बीड येथे आलेले नवीन पोलीस अधीक्षक राजा रामस्वामी यांनी केज येथील पोलीस स्टेशनला भेट देऊन येथील परिसराची व पोलीस स्टेशनची माहिती जाणून घेतली. या वेळी पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, साहेब पोलीस निरीक्षक यूदुफवडगाव पोलीस स्टेशनचे आनंद झोटे, साहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे, तसेच नेकनूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केंद्रे हे उपस्थित होते. यावेळी पोलीस दलाने पोलीस अधीक्षक राजा रामस्वामी त्यांना मानवंदना दिली. पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारी रोखणे आणि प्रलंबित गुन्ह्यांचा तपास करणे या बाबत राजा रामस्वामी यांनी केज, युदुफवडगाव व नेकनूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. 

केज येथे पोलीस कल्याण योजने अंतर्गत नियोजित पेट्रोल पंपाच्या जागेची पाहणी केली. पोलीस वसाहतीला भेट दिली आणि पोलीस स्टेशनच्या परिसरात असलेल्या इमारतीची पाहणी केली.

close