shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष दिपक अण्णा काटे यांचा कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी सत्कार..!!

इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)➤
देव-देवता, महापुरुषांसाठी व धर्मासाठी शेवट पर्यंत लढणार - दिपक अण्णा काटे यांचा निर्धार


छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव विडीला दिल्यामुळे  त्यांचा रोज होणार अवमान रोखण्यासाठी शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष दिपक अण्णा काटे व त्यांचे सहकारी यांनी पुरंदर च्या पायथ्याशी  सलग पाच दिवस आमरण उपोषण करुन अखेर विडी मालकाला नाव बदलण्यास भाग पाडले.जे गेल्या ८८ वर्षांत झाले नाही ते अवघ्या ८ दिवसात करायला भाग पाडले व त्या कंपनी मालकांवर ८८ वर्षांत पहिल्यांदाच गुन्हा दाखल झाला.

या यशात सहभागी असणाऱ्या पुर्वा ताई काळे यांचा दिपक अण्णा काटे व त्यांचे सहकारी यांनी राशीन येथील त्यांच्या राहत्या घरी जाऊन सन्मान केला. यावेळी बोलताना दिपक अण्णा काटे म्हणाले की हे यश केवळ माझे एकट्याचे नसुन संपूर्ण शिवधर्म फाउंडेशन चे पदाधिकारी , मित्र परिवार व पुर्वा ताई सारख्या रणरागिणी व अश्या पवित्र कामासाठी त्यांना प्रोत्साहन देणारे त्यांचे आजोबा व सोशल मिडिया तून संपूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला प्रोत्साहन देणारे सर्व शिवप्रेमी यांचे हे यश आहे. इथून पुढेही आम्ही नेहमीच देव देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी लढणार आहोत.त्यासाठी आम्हाला तुमच्या अश्याच पाठिंब्याची गरज आहे.आम्ही साबळे वाघिरे आणि कंपनी यांना एक महिना वेळ दिला आहे जर एका महिन्यात नाव बदलले नाही तर कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल याची कंपनी मालक व प्रशासन यांनी नोंद घ्यावी.

यानंतर पुर्वा ताई काळे बोलताना म्हणाल्या मी जे आमरण उपोषण केले ते काही मी खुप मोठं काम केले असे मी समजत नाही.कारण ते माझं परम कर्तव्य आहे.जर मी एक मुलगी असुन जर माझ्या भावना अश्या आहेत तर जे स्वताला शिवभक्त म्हणुन घेतात ते आपल्या महाराजांचा होणारा अवमान कसा सहन करतात.

इथुन पुढे कोणत्याही महापुरुषांचा अवमान होऊ नये किंवा कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून आपण सर्व अन्याया विरुद्ध लढणारे दिपक अण्णा काटे यांच्या सारख्या आपल्या भावांच्या पाठिशी खंबीर पणे उभे राहिले पाहिजे.दिपक अण्णा काटे त्यांच्या सर्व सहकारी यांनी जो इथे येऊन माझा जो सन्मान केला त्यांचे आभार मी शब्दात व्यक्त करु शकत नाही.व त्यांची अशीच साथ आम्हाला कायम लाभेल अशी अश्या व्यक्त करते.

कर्जत तालुक्यातील खेड ,राशीन बाभुळगाव,शिंपोरा,कर्जत ,   वडगाव तनपूरा ,कोर्टी अशा विविध गावांत तेथील ग्रामस्थांन तर्फे त्यांच्या केलेल्या कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.यावेळी दिपक अण्णा काटे,मयूरजी काळे,स्वप्निल तनपूरे, सुनील पालवे,पाठक साहेब, विष्णु भाऊ कुऱ्हाडे, दत्ता भाऊ जगताप,सागर पोमण,राज तापसे, भैय्या ढाणे,किरण साळुंखे, मंथन पवार व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावकऱ्यांनी दिलेला सन्मान व केलेला सत्कार हा आम्हाला आमच्या पुढील कार्यास प्रोत्साहन देत राहील व आम्ही शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे त्यांचे जाहीर आभार मानतो. अशी भावना दिपक अण्णा काटे यांनी व्यक्त केली.
close